जेमिमाह रॉड्रिग्ज (Photo Credit: Getty)

पुरुषांचा खेळ समजले जाणाऱ्या क्रिकेटच्या खेळात आजवर आपणास अनेक लेजेंड खेळाडू मिळाले आहेत. सर डॉन ब्रॅडमन, सर विवियन रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग यांसारखे अनेक खेळाडूंनी या खेळाला प्रसिद्धी मिळवून दिली आहे. पण, आज याच खेळात पुरुष खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावत अनेक महिला खेळाडूंनी प्रसिद्धी मिळवली आहे. आज भारतात मिथाली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना यासारख्या महिला खेळाडूंनी पुरुषांच्या खेळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाला (India Women's Cricket Team) प्रसिद्धी देणाऱ्या राजचे कौशल्याचे सर्वांनी कौतुक केले. यात अजून एका भारतीय महिला खेळाडूंचे नाव शामिल करत आहे आणि ते म्हणजे, 18 वर्षीय मुंबईची जेमिमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues).  (18 वर्षाच्या 'या' भारतीय महिला क्रिकेटपटूचा इंग्लंडमध्ये डंका, महिला सुपर टी-20 लीगमध्ये ठोकले सर्वात वेगवान शतक)

इतक्या कमी वयात जेमिमाहने भारतीय क्रिकेटमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहेत. टीम इंडियामध्ये तिला 'छोटा पॅकेट बडा धमाका' असे म्हटले जाते. मास्टर ब्लास्टरदेखील सचिन तेंडुलकर देखील महिला क्रिकेट टीम आणि जेमिमाहचे कौतुक केल्याशिवाय राहू शकला नाही. आज टीम इंडियाची 'लिटिल गर्ल' चा 19 वा वाढदिवस आहे. या खास दिवशी आपण जाणून घेऊया जेमिमाहच्या कारकिर्दीमधील 5 रोचक गोष्टी:

1. जेमिमाहने 13 व्या वर्षी अंडर-19 खेळली. इतक्या लहान वयात तिने अंडर-१९ वनडे स्पर्धेत दुहेरी शतक ठोकले होते. तिने 17 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

2. तिने सौराष्ट्राविरुद्ध घरच्या सामन्यात तिच्या संघाला 50 षटकांत दोन बाद 347 धावा करण्यास मदत केली. तिने एकटीने 202 धावांचा केल्या आणि तेही फक्त 163 चेंडूंमध्ये.

3. तिच्या शाळेच्या काळात, तिला फुटबॉल आणि बास्केटबॉलमध्ये तसेच राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटूमध्ये खूप रस होता. तिने हॉकीमध्येही अंडर-17 पातळीवर मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे.

4. जेमीमाहने अगदी लहान वयातच खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला तिने एक गोलंदाजी म्हणून प्रयत्न केला आणि आता ती अव्वल फळीतील फलंदाज बनली आहे. सुरुवातीच्या काळात ती डावाची सुरुवात करायची पण, भारतीय संघात तिला मधल्या फळीत फलंदाजम्हणून निवडले गेले.

5. क्रिकेट चाहत्यांना हे लक्षात असेल की, इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याच्या एका ओव्हरमध्ये सहा षटकार लगावत भारतीय फलंदाज युवराज सिंह याने इतिहास रचला होता. असच काहीसं जेमिमाहने देखील केले. जेमिमाहने श्रीलंकेविरुद्ध नीलाक्षी डी सिल्वाच्या चौथ्या ओव्हरमध्ये सलग तीन षटकार लगावले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये तीन षटकार ठोकणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली.