हरभजन सिंह, गौतम गंभीर आणि व्हीव्हीस लक्ष्मण (Photo Credits: Getty Images)

शीख धर्माचे पहिले गुरु नानक देव (Guru Nanak) जी यांची आज 550 वी जयंती आहे. आजचा दिवस देश आणि जगभरात 550 वा प्रकाशोत्सवाच्या रूपात साजरा केला जात आहे. आजच्या या दिवसाला प्रकाशोत्सव आणि गुरु पर्व असेही म्हणतात. आजच्या या खास दिवशी माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh), व्हीव्हीस लक्ष्मण (VVS Laxman) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी सर्वांना गुरु नानक देव जी यांच्या 550 व्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. श्री गुरु नानक देव जी महाराजांचा 5050 वा प्रकाश पर्व देशभरात जल्लोषात साजरा केला जात आहे. गुरु नानक देव यांचे आदर्श आणि त्यांचे समाजाप्रती दिलेल्या योगदानाचे स्मरण करून संपूर्ण राष्ट्र त्यांना अभिवादन करीत आहे.

आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देत भज्जीने लिहिले की, "गुरु नानक देव जी तुम्हाला शांतीचा आशीर्वाद देवो आणि तुम्हाला चिरंतन आनंद आणि आनंद देईल. 2019 गुरुपुरबच्या शुभेच्छा". दुसरीकडे, टीम इंडियाचा माजी सलामी फलंदाज गंभीरने त्याचा गुरुद्वारामधील फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, "नानक नाम चढ़दी कला, तेरे भाणे सरबत दा भला ! गुरु नानक देव जी च्या 550 व्या जयंतीस, तुम्हा सर्वांना, लक्ष-लक्ष शुभेच्छा!"

हरभजन सिंह

गौतम गंभीर 

व्हीव्हीस लक्ष्मण

गुरु नानक यांचा जन्म नानकाना साहिबमध्ये 15 एप्रिल 1469 रोजी झाला होता. ते शीखांचे पहिले गुरु होते. त्यांना लडाख आणि तिबेटमध्ये नानक लामा असेही म्हणतात, त्यांच्या वडिलांचे नाव कल्याणचंद किंवा मेहता काळू जी होते आणि आईचे नाव तृप्ति देवी होते. नानक परोपकारी होते, त्यांची मते अजूनही लोकांना योग्य मार्ग दाखवतात. क्रिकेटपटूंशिवाय राजकीय व्यक्ती- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही आजच्या दिवसाच्या देशवासियांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या.