Narendra Modi Stadium (Photo Credit: Twitter)

GT vs LSG, IPL 2025, Ahmedabad, Pitch Report, Weather Forecast: इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या (IPL 2025) च्या 64 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) चा सामना आज 22 मे रोजी, गुरुवारी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध होत आहे. हा सामना गुजरातचे होम ग्राउंड (Narendra Modi Stadium) अहमदाबाद येथे खेळला जात आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सचा संघ मैदानात उतरेल. गुजरातपुढे हा सामना जिंकून टॉप टूमध्ये आपले स्थान पक्के करायचे आव्हान आहे. दुसरीकडे, मागील सामन्यात पराभव पत्करून प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौदेखील विजय नोंदवून इच्छील.

हवामान अंदाज - अहमदाबाद

अ‍ॅक्यूवेदरच्या अंदाजानुसार, अहमदाबादमधील तापमान खेळाच्या सुरुवातीला सुमारे 37 अंश सेल्सिअस असेल आणि शेवटी ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. सामन्याच्या वेळेत आर्द्रतेत सुमारे 37% ते 49% पर्यंत चढ-उतार होईल. आकाश स्वच्छ राहील आणि संपूर्ण सामन्यात पावसाची शक्यता नाही.

गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कधी खेळला जाईल?

गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, यांच्यातील सामना आज 22 मे रोजी, संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.

गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कुठे खेळला जाईल?

गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, यांच्यातील सामना आज 22 मे रोजी, संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल

दोन्ही संघांचे खेळाडू

गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुधरसन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रुदरफोर्ड, राहुल तेवतिया, शाहरुख खान, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.

लखनौ सुपर जायंट्स: मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (सीअँडडब्ल्यूके), आयुष बडोनी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, आवेश खान, रवी बिश्नोई, विल्यम ओरूरके