
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी खेळवण्यात आला. दोन्ही संघांमधील हा सामना शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव करत मालिका ताब्यात घेतली. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना उद्या म्हणजेच 3 डिसेंबरला बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) एक मोठा विक्रम धोक्यात आला आहे. युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) विराट कोहलीचा हा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिकेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. पण टीम इंडियाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड हा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आला आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणार्या 5व्या टी-20 सामन्यात त्याने 19 धावा केल्या तर ऋतुराज गायकवाड टीम इंडियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल. (हे देखील वाचा: KL Rahul In ODI: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून केएल राहुलची अशी आहे कामगिरी, येथे पाहा मनोरंजक आकडेवारी)
ऋतुराज गायकवाड जबरदस्त फार्ममध्ये
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 2021 साली इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 231 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेतील पहिल्या 4 सामन्यात 213 धावा केल्या आहेत. या काळात ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतकही झळकले आहे. ऋतुराज गायकवाडने 71.00 च्या सरासरीने आणि 166.40 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत.
टी-20 आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिकेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा
विराट कोहलीच्या 231 धावा- इंग्लंडविरुद्ध
केएल राहुलने न्यूझीलंडविरुद्ध 224 धावा केल्या
ऋतुराज गायकवाड 213 धावा- ऑस्ट्रेलियाविरुद्ध*
इशान किशन 206 धावा- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध
श्रेयस अय्यर 204 धावा- श्रीलंकेविरुद्ध
तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावले
या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शानदार फलंदाजी करत केवळ 57 चेंडूत नाबाद 123 धावा केल्या. यादरम्यान ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून 13 चौकार आणि 7 षटकार मारले गेले. यासह रुतुराज गायकवाड टी-20 मध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. याआधी हा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी 122 धावांची नाबाद इनिंग खेळली.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावा केल्या. टीम इंडियाकडून रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशुइसने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 154 धावाच करू शकला.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक नाबाद 36 धावांची खेळी खेळली. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना रविवारी बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.