ऑस्ट्रेलिया संघाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने खेळापासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) सांगितले. मानसिक आरोग्याच्या समस्या यामागचे कारण सांगितले जात आहे. मॅक्सवेलने श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध सध्या सुरु असलेल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये 62 धावांची खेळी केली. आणि आता मालिकेतील अंतिम सामन्यासाठी मॅक्सवेलची जागा डार्सी शॉर्ट (D'Arcy Short) याने घेतली आहे. यापूर्वी झालेल्या दुसऱ्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 9 विकेट्सने पराभव करत मालिकेत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली आणि मालिका खिशात घातली. दरम्यान, मॅक्सवेलच्या मानसिक आरोग्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया टीम मानसशास्त्रज्ञ डॉ. मायकेल लॉईड म्हणाले की, “मॅक्सवेलला त्याच्या मानसिक आरोग्याबाबत काही अडचणी येत आहेत. परिणामी, तो खेळापासून थोडा वेळ दूर राहील. (AUS vs SL 2nd T20I: लक्षन संदकन याने स्टिव्ह स्मिथ याला धावबाद करण्याची सुवर्ण संधी गमावल्याने सोशल मीडियावर झाला ट्रोल)
राष्ट्रीय संघांचे कार्यकारी महाव्यवस्थापक बेन ऑलिव्हर म्हणाले: “आमच्या खेळाडूंचे आणि कर्मचार्यांचे चांगले आरोग्य त्यांच्यासाठी सर्वोपरि आहे. ग्लेनला आमचा पूर्ण पाठिंबा आहे." ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकामधील तिसरा आणि अंतिम सामना मेलबर्नमध्ये खेळला जाईल. शॉर्ट यापूर्वी डब्ल्यूएच्या मार्श वनडे कप स्पर्धेत खेळला होता. श्रीलंकानंतर रविवारी सिडनीमध्ये सुरू होणार्या तीन टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानशी सामना होईल.
JUST IN: Glenn Maxwell will take a break from cricket.
All the best, Maxi ❤
Details: https://t.co/6jISP4zccq pic.twitter.com/NTy7WwXJkO
— cricket.com.au (@cricketcomau) October 31, 2019
ऑस्ट्रेलियाचा टी-20 संघ: एरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, सीन अॅबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, बेन मैकडेर्मोट, केन रिचर्डसन, डार्सी शॉर्ट, बिली स्टॅनलेक, मिशेल स्टार्क, अॅश्टन टर्नर आणि अॅडम झांपा.