KL Rahul and Hardik Pandya (Photo Credits: Twitter)

IPL 12 : 'कॉफी विथ करण' (Koffe with Karan) या कार्यक्रमातील महिलांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि लोकेश राहुल (KL Rahul) यांना करण जोहर (Karan Johar) याची कॉफी जास्तच महागात पडली आहे. मात्र येत्या काही दिवसात सुरु होणाऱ्या आयपीएल (IPL) क्रिकेट सामन्यासाठी पांड्या आणि राहुल यांना खेळण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी आयपीएल संघ मालकांकडून केली जात आहे.

ऑस्ट्रेलिया (Australia) आणि न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यातून पांड्या आणि राहुल यांना मायदेशी भारतात चौकशीसाठी बोलवण्यात आले. तसेच संघातून आता हकालपट्टी केल्याने आयपीएल मध्ये तरी या दोघांना संधी द्या अशी मागणी संघ मालकांकडून बीसीसीआय(BCCI)कडे करण्यात येत आहे. तर पांड्या आणि राहुल आयपीएलमध्ये 'किंग्ज इलेव्हन पंजाब' (Kings XI Punjab) या संघाकडून खेळतात.

येत्या 23 मार्च पासून आयपीएल क्रिकेट सामन्याला सुरुवात होणार आहे. Inside Sports ने दिलेल्या माहितीनुसार, संघाच्या वरिष्ठांनी पांड्या आणि राहुल यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत संघामध्ये त्यांना न घेण्याच कोणते ही कारण आमच्याकडे नाही असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बीसीसीआयने या दोघांच्या बाबतीत लवकर निर्णय घेतल्यास सरावासाठी वेळ मिळेल असे मत मांडले आहे. तर विरिष्ठ अधिकाऱ्याचे गुप्त ठेवण्यात आले असून बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहण्याजोगे असणार आहे.