Nita Ambani | (Photo Credits: Twitter/ANI

congratulates MI Cape Town : एमआय केप टाउनचा (MI Cape Town) कर्णधार कागिसो रबाडा यांने उत्तम कामगिरी करत वँडरर्स स्टेडियममध्ये त्यांच्या संघाला त्यांचे पहिले एसए 20 जेतेपद मिळवून दिले. SA20 2025 लीगमधील पहिली ट्रॉफी उचलत, एमआय केप टाउनने सुरुवातीपासून संपूर्ण हंगामात त्यांचे वर्चस्व दाखवले होते. लीगमध्ये सातत्य राखून त्यांनी एकामागून एक सामने जिंकले. (MICT vs SEC SA20 2025 Final Scorecard: एमआय केपटाऊनने पहिल्यांदाच SA20 विजेतेपद जिंकले; सनरायझर्स ईस्टर्न केपचा 76 धावांनी पराभव)

नीता अंबानी 

या विजयामुळे रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी शनिवारी एमआय केप टाउनचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, 'मुंबईपासून न्यू यॉर्कपर्यंत, यूएईपासून केप टाउनपर्यंत एमआय संघांनी लीग जेतेपद जिंकले आहे. त्यासोबतच जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. हे विजेतेपद आमच्या उत्कृष्टतेबद्दलच्या वचनबद्धतेचे, प्रतिभेवरील विश्वासाचे आणि मुंबई इंडियन्सच्या भावनेचे प्रतीक आहे. आम्ही खरोखरच एक जागतिक कुटुंब आहोत, खेळाबद्दलच्या आमच्या उत्कटतेने एकत्रित आहोत. आमच्या सर्व चाहत्यांचे त्यांच्या अढळ पाठिंब्याबद्दल मनापासून आभार. हा विजय तुमचा आणि आमचाही तितकाच आहे. एमआय केप टाउनचे अभिनंदन!', असे रिलायन्स फाउंडेशनच्या प्रेस रिलीजमध्ये नीता अंबानी म्हणाल्या.

आकाश अंबानी यांनी केले संघाचे अभिनंदन

मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनीही एमआय केप टाउन संघाचे अभिनंदन केले. 'या हंगामात एमआय केप टाउनचा प्रवासाबद्दल मला संघाचा अभिमान वाटत आहे. हा विजय प्रक्रियेवर विश्वास ठेवणे आणि मनापासून खेळणे याचा आहे. हा विजय आमच्या चाहत्यांचा आहे, ज्यांनी प्रत्येक उतार-चढावात आमच्या पाठीशी उभे राहिले.', असे आकाश अंबानी म्हणाले

या ऐतिहासिक विजयासह, मुंबई इंडियन्सने जागतिक फ्रँचायझी क्रिकेटमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करत आहे. गेल्या 17 वर्षांत, मुंबई इंडियन्स (आयपीएल आणि डब्ल्यूपीएल), एमआय केप टाउन, एमआय एमिरेट्स आणि एमआय न्यू यॉर्क यांचा समावेशासह जगभरात 11 टी20 लीगमध्ये जेतेपदे मिळाली आहेत. यामध्ये पाच आयपीएल चॅम्पियनशिप, दोन चॅम्पियन्स लीग आणि २०२३ मध्ये पहिले डब्ल्यूपीएल आणि मेजर लीग क्रिकेट जेतेपदे, तसेच 2024 मध्ये आयएलटी20 जेतेपद यांचा समावेश आहे.