Lahiru Thirimanne Car Crash (Photo Credits: X)

Thirimanne Hospitalized After Car Crash: श्रीलंकेतील अनुराधापुरा येथे गुरुवारी (14 फेब्रुवारी) झालेल्या भीषण कार अपघातानंतर श्रीलंकेचा माजी क्रिकेट कर्णधार (Former Sri Lankan Cricket Captain) लाहिरू थिरिमाने (Lahiru Thirimanne) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुटुंबीयांसह प्रवास करत असलेले थिरिमाने या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अनुराधापुरा टीचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्या दुखापतींचे नेमके स्वरूप स्पष्ट झालेले नाही. थिरिमाने यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या आणखी एका कुटुंबीयालाही दुखापत झाली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

कुटुंबातील सदस्यांसह प्रवास करत असताना थिरिमाने यांच्या कारची आणि एका लॉरीची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. थिरिमाने यांना आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय उपचारासाठी अनुराधापुरा टीचिंग हॉस्पिटलमध्ये नेले. थिरिमानेच्या दुखापतींचे तपशील उघड झाले नसले तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. श्रीलंका स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय क्रिकेटपटूला "अपघातात किरकोळ दुखापत" झाल्याने अनुराधापुरा टीचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी असेही सांगितले की थिरिमाने ज्या वाहनात प्रवास करत होते त्यात आणखी तीन लोक होते आणि गुरुवारी सकाळी 07:45 च्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका लॉरीला धडकले. ज्यामुळे हा अपघात घडला. (हेही वाचा, Ulhasnagar Car Accident: अनियंत्रित कार चहाच्या दुकानात घुसली, घटनेचा Video आला समोर, उल्हासनगर परिसरात खळबळ)

थिरिमाने सध्या लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये न्यूयॉर्क स्ट्रायकर्स क्रिकेट फ्रँचायझीसाठी खेळत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या अधिकृत निवेदनामध्ये त्याच्या कारचा अपघात झाल्याच्या वृत्ताची पुष्टी करण्यात आली. तसेच, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात आले. न्यूयॉर्क स्ट्रायकर्स फ्रँचायझीने म्हटले आहे की, "आम्ही कळवू इच्छितो की लाहिरू थिरिमाने आणि त्यांचे कुटुंब मंदिराला भेट देण्यासाटी गेले असता त्यांच्या कारला अपघात झाला.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फ्रँचायझीने म्हटले आहे की, थिरिमाने यांच्या प्रकृतीला आराम मिळावा यासाठी त्यांच्या चाहत्यांनी सदिच्छा द्याव्यात. जेणेकरुन त्यांना लवकर आराम मिळेल.

एक्स पोस्ट

श्रीलंका क्रिकेटमधील योगदानासाठी प्रसिद्ध असलेल्या थिरिमानेने 44 कसोटी सामने, 127 एकदिवसीय सामने आणि 26 टी-20 सामन्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा आनंद लुटला. जुलै 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यापूर्वी त्याने 2014 च्या विजयी आवृत्तीसह तीन T20 विश्वचषक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.