राजस्थानचा 36 वर्षीय वेगवान गोलंदाज पंकज सिंहने (Pankaj Singh) आज (10 जुलै) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज पंकज सिंगने राजस्थान क्रिकेट बोर्डाच्या सेक्रेटरीला एक पत्र लिहून देशांतर्गत क्रिकेट बोर्डाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याने 2004 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये राजस्थानकडून पदार्पण केले होते. त्याला 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडूनही खेळला आहे.
पंकज सिंहने 2010 साली श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने 7 षटकांत 45 धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट्स मिळवता आला नाही. यानंतर परत त्याला कधी एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने 2014 साली रणजीत चमकदार कामगिरी केली. निवडकर्त्यांचे नजर पुन्हा एकदा पंकज सिंहवर पडली. ज्यामुळे त्याचा इंग्लंड दौर्यासाठी कसोटी संघात त्याचा निवड करण्यात आली. लॉर्ड्स टेस्टमध्ये दुखापत झाल्यानंतर इशांत शर्मा बाहेर गेला. इशांतच्या जागी पंकज सिंहचा संघात समावेश करण्यात होता. त्याने साऊथॅम्प्टन मैदानावर पदार्पण केले. या सामन्यात त्याला एकही विकेट्स मिळाला नाही. त्यानंतर त्याने पुढची कसोटी मँचेस्टर येथे खेळली, जिथे त्याला दोन विकेट्स मिळाले. त्यानंतर पंकज सिंह देशाकडून एकही सामना खेळला नाही. हे देखील वाचा -IPL: सूर्यकुमार यादवच्या सर्वकालीन आयपीएल XI मधून MS Dhoni याला डच्चू, तर स्टार फलंदाज David Warner ‘या’ कारणामुळे झाला अवाक
परंतु, रणजी ट्रॉफीमध्ये त्याने चांगली कामगिरी करून दाखवली. वर्षानुवर्षे पंकजसिंगची गोलंदाजी आणखी आक्रमक झाली. डिसेंबर 2018 मध्ये पंकज सिंह रणजी ट्रॉफीत 400 विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला होता. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 117 सामन्यात 23.76 च्या सरासरीने 472 विकेट्स घेतले आहेत. तसेच लिस्ट ए मध्ये त्याने 79 सामने खेळले. ज्यात तिने 26.99 च्या सरासरीने 118 विकेट्स घेतले आहेत.