BCCIचे नियम पाळण्यास अरुण लाल यांचा नकार, म्हणाले- 'नरेंद्र मोदींचं वय 69 आहे आणि तरीही कोरोना काळात देश चालवतायत'
अरुण लाल (Photo Credit: Twitter)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा इंडियन प्रीमियर लीगच नव्हे तर कोविड-19 दरम्यान मानक कार्यप्रणाली (SOP) जारी करून घरगुती क्रिकेटदेखील सुरू करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 60 वर्षांवरील व्यावसायिकांना प्रशिक्षण सत्रात भाग घेण्यास प्रतिबंधित करण्याच्या मंडळाच्या या निर्णयामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू आणि बंगालच्या रणजी संघाचे (Bengal Ranji Team) प्रशिक्षक अरुण लाल (Arun Lal) निराश झाले आहेत. बीसीसीआयच्या एसओपी नुसार लाल प्रशिक्षण क्षेत्रात राहण्यास पात्र नाहीत, विशेषतः त्यांनी यापूर्वी कर्करोगाचा सामना केला आहे आणि वैद्यकीय इतिहासाची व कमी प्रतिकारशक्ती असणार्‍या लोकांसाठी कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे स्वत:ला प्रकट करणे धोकादायक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे उदाहरण देऊन लाल यांनी बीसीसीआयच्या या निर्देशाचा प्रतिकार केला आणि म्हणाले, "पंतप्रधान 69 वर्षांचे आहेत आणि या काळात ते देश चालवत आहे. तर त्यांनाही पद सांगणार आहात का?" (BCCI कडून घरगुती क्रिकेट पुनरारंभवर SOPs जाहीर; खेळाडूंनी सहमती फॉर्म साइन करणे आवश्यक, प्रशिक्षण शिबिरापूर्वी खेळाडूंची दोनदा कोरोना व्हायरस टेस्ट)

बंगालचे प्रशिक्षक पुढे म्हणाले की जोपर्यंत व्हायरसचा धोका कायम आहे तोपर्यंत ते खोलीत बंदिस्त होणार नाही आणि आपले जीवन त्याच्या इच्छेनुसार जगातील. “एक माणूस म्हणून मी पुढची 30 वर्ष घरात स्वतःला कोंडून घेणार नाही. मला जसं हवंय तसं आयुष्य मी जगेन. सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे, मास्क घालण्यासारखे नियम पाळणं महत्वाचं असलं तरीही बीसीसीआयने 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी नियम बनवला असला तरीही मी त्याचं पालन करणार नाही.” एसओपीमुळे लाल आणि बीसीसीआयला चिकट विकेटवर आणून ठेवले आहे आणि येणाऱ्या आठवड्यांत परिस्थिती कशी सुटेल हे पाहणे बाकी असेल.

घरगुती क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी बीसीसीआयने एसओपी जाहीर केले ज्यानुसार 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे आणि मूलभूत वैद्यकीय परिस्थिती असलेल्या व्यक्तींनाही प्रतिबंधित केले आहे. कोविड-19 दरम्यान प्रशिक्षणास पुन्हा सुरू करण्याच्या जोखमीची कबुली देऊन खेळाडूंनी फॉर्मवर स्वाक्षरी करावी लागेल आणि स्टेडियमकडे जाण्यापासून ते प्रशिक्षणापर्यंत खेळाडूंना कडक सेफ्टी प्रोटोकॉल पाळावे लागतील.