भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर आणि पत्नी फरहीन यांच्यावरील गंभीर आरोप, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
मनोज प्रभाकर (Photo Credit: IANS)

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) गुरुवारी भारतीय क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू मनोज प्रभाकर (Manoj Prabhakar) आणि त्याची पत्नी फरहीन (Farheen) यांच्याविरोधात फौजदारी खटल्याचा गुन्हा दाखल केला. या दोघांविरोधात एफआयआर लंडनमध्ये राहणाऱ्या प्रभाकरची माजी पत्नी संध्या शर्मा पंडित (Sandhya Sharma Pandit) यांनी दाखल केली आहे. मालवीय नगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या एफआयआरमध्ये संध्याने प्रभाकरवर आरोप केला आहे की त्याने काही राजकारण्यांच्या मदतीने दक्षिण दिल्लीतील आपला फ्लॅट विकला. या प्रकरणात संध्याने जेव्हा प्रभाकर आणि त्यांच्या पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा या जोडप्याने संध्याला त्याचे भयानक परिणाम भोगायला लागतील असे सांगितले. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम420/468/471/120-बी-34 च्या अंतर्गत संध्याने प्रभाकर आणि फरहीन यांच्यासह काही जणांवर तिची संपत्ती लागण्याचा गुन्हा नोंदविला आहे.

पोलिस सूत्रांनी सांगितले की, सुरुवातीला हा कौटुंबिक मुद्दा असल्याचा भास होत होता परंतु तपासणीनंतर दिसून आले की त्या मालमत्तेवर फरहीनचा डोळा होता. संध्या, ही माजी क्रिकेटपटू प्रभाकरची पहिली पत्नी आहे. हा फ्लॅट परत देण्यासाठी फराहिनने 1.50 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्यवसायाने अभिनेत्री फरहीनने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात तमिळ आणि कन्नड चित्रपटांद्वारे केली. नंतर ती मुंबईत शिफ्ट झाली. काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने बॉलिवूड सोडले आणि प्रभाकरशी लग्न केले, त्यानंतर तिचे संध्यासोबतचे नात्यात कटुता निर्माण झाली.

संध्याने असा आरोप केला आहे की, जुलै 2019 मध्ये मनोज प्रभाकर यांच्या गुंडांनी फ्लॅटचे कुलूप तोडून त्याचा ताबा घेल्याचे तिला आपल्या भावाकडून कळले. विशेष म्हणजे मनोज आणि त्याची पत्नी फराहीन आणि त्यांची दोन मुले याच इमारतीत पहिल्या मजल्यावर राहत आहेत. पोलिसांनी सांगितले की याप्रकरणी तपास सुरू झाला असून प्रभाकर आणि त्यांची पत्नी यांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. प्रभाकरची बाजू जाणून घेण्याचा आयएएनएसने प्रयत्न केला पण शुक्रवारी संध्याकाळपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.