IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेला रविवारी (4 डिसेंबर) ढाका येथे सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडमधील मालिका संपल्यानंतर टीम इंडिया नव्या तयारीसह बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, (Rohit Sharma) माजी कर्णधार विराट कोहली, (Virat Kohli) उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) संघात पुनरागमन करत आहेत. न्यूझीलंडमध्ये संघाचे नेतृत्व करणारा शिखर धवनही (Shikhar Dhawan) संघात असेल. भारतीय संघ सात वर्षांनंतर बांगलादेशमध्ये एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
शेवटच्या वेळी 2015 मध्ये तीन एकदिवसीय मालिकेत 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता. भारताने तेथे प्रथमच एकदिवसीय मालिका गमावली होती. यावेळी रोहित शर्माचा संघ त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे. जाणून घेऊया मॅचच्या प्रक्षेपण आणि ऑनलाइन टेलिकास्टशी संबंधित सर्व माहिती... (हे देखील वाचा: ODI World Cup 2023 च्या तयारीवर कर्णधार Rohit Sharma च मोठं वक्तव्य, उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!)
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना ४ डिसेंबरला म्हणजेच रविवारी होणार आहे. तसेच हा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर होणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश सामना कधी सुरू होईल?
भारत आणि बांगलादेश सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता आहे.
सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर पाहता येईल?
सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे या मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार आहेत. सोनी स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर तुम्ही हिंदी आणि इंग्रजीशिवाय देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह हा सामना पाहू शकता.
फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी पाहणार?
या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग भारतात सोनी लिव्ह अॅपवर पाहता येईल.