Photo Credit- X

BCCI Awards 2025: लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांचा मुलगा अग्नि चोप्रा (Agni Chopra) याला शनिवारी, 1 फेब्रुवारी रोजी बीसीसीआय पुरस्कार 2025 मध्ये माधवराव सिंधिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. युवा डावखुऱ्या खेळाडूने रणजी ट्रॉफी 2023-24 प्लेट लीगमध्ये फलंदाजीने चमकदार कामगिरी केली होती. त्याने सहा सामन्यांमध्ये 78.25 च्या सरासरीने 939 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याचा सर्वोत्तम स्कोअर 166 होता. अग्नि चोप्राचा स्ट्राईक रेटही 103.30 होता. (BCCI Naman Awards 2023-24: स्मृती मानधनानं घडवला इतिहास, चौथ्यांदा जिंकला बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार)

अग्नि चोप्राला माधवराव सिंधिया पुरस्कार प्रदान

भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बीसीसीआय पुरस्कार 2025 मध्ये सन्मानित झाल्यानंतर, अग्नि चोप्राने सोहळ्यातील पुरस्कार विजेत्यांचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला "महान लोकांमध्ये असल्याबद्दल आभारी आहे", असे त्याने पोस्टमध्ये लिहिले.