आज बदलणार फिरोज शहा कोटला स्टेडिअमचे नाव, विराट कोहली याला सुद्धा मिळणार सन्मान
Feroz Shah Kotla Stadium and Arun Jaitley (Photo Credits-Twitter)

नवी दिल्ली (New Delhi) मधील फिरोज शहा कोटला स्टेडिअमचे (Feroz Shah Kotla Stadium) नाव बदलून माजी अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांचे नाव आज (12 सप्टेंबर) देण्यात येणार आहे. तर जेटली यांचे या स्टेडिअमला नाव देण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. त्याचसोबत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला सुद्धा महत्वाचा सन्मान देण्यात येणार आहे. फिरोज शहा कोटला स्टेडिअमच्या पवेलियन स्टॅन्डला विराट कोहली याचे नाव देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु पवेलियन स्टॅन्डचे नाव कोहली ठेवण्याचा कार्यक्रम जवाहरलाल नेहरु स्टेडियमच्या भरोत्तोलन येथे होणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान हा निर्णय घेण्यात येणार आहे.

खरतर देशाची राजधानी दिल्लीतील फिरोज शहा कोटला स्टेडिअमला आता दिवंगत माजी आर्थिक मंत्री अरुण जेटली यांच्या नावाने ओखळे जाणार आहे. त्यामुळे आज याचे अधिकृतरित्या नाव बदलण्यात येणार आहे. अरुण जेटली यांचे गेल्या महिन्यात आजारपणामुळे निधन झाले.(फिरोज शहा कोटला स्टेडियम चे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम ठेवणार; DDCA ची घोषणा)

डीडीएसचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी असे म्हटले आहे की, फिरोज शहा कोटला याचे नाव बदलण्यात येणार असल्याचा सोहळा शानदार असणार आहे. तसेच त्यांना श्रद्धांजली सुद्धा यावेळी देण्यात येणार आहे. क्रिकेटशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला जेटली यांचे या मधील योगदान अजूनही माहिती आहे. जेटली यांचे नाव स्टेडिअमला दिल्यास त्यामागील उद्देश पूर्ण होणार असल्याचे ही म्हटले आहे.या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय क्रिडा मंत्री किरन रिजिजू यांच्यासह अरुण जेटली यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, अरुण जेटली हे क्रिकेटविश्वाशी फार जवळून जोडले गेले होते. भारतीय संघातील अनेक खेळाडू जसे की विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशिष नेहरा, रिषभ पंत आणि अन्य अनेकांना त्यांनी पाठिंबा देत पुढे आणले होते. यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर या सर्व खेळाडूंनी शोक व्यक्त केला होता. त्यादिवशीच भारत व वेस्ट इंडिज या सामन्यातही टीम इंडिया काळी फित बांधून खेळली होती.