Security Breach At Arun Jaitely Stadium: दिल्ली विरुद्ध रेल्वे रणजी ट्रॉफी 2024-25 सामन्यादरम्यान विराट कोहलीचे (Virat Kohli)प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन निराशाजनक होते. कोहली सहा धावांवर बाद झाला. कोहली 13 वर्षांनंतर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी सामना खेळत आहे. तो शेवटचा 2013 मध्ये दिल्लीकडून खेळला होता. विराट कोहलीची फॅन फॉलोइंग कोणापासूनही लपलेली नाही, याचे एक उदाहरण अरुण जेटली स्टेडियममध्ये (Arun Jaitely Stadium) पाहायला मिळाले. रणजी ट्रॉफीच्या दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सुरक्षेत मोठी चूक झाली.
तीन चाहते सुरक्षा घेरा तोडून विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात घुसले. यावेळी, मैदानावर सुमारे 20 सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. ज्यांनी चाहत्यांना बाहेर काढले. या घटनेमुळे खेळ काही मिनिटांसाठी थांबवावा लागला. यापूर्वी सामन्याच्या पहिल्या दिवशीही सुरक्षेत भंग झाला होता. विराट कोहलीच्या उपस्थितीमुळे स्टेडियममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था होती.
विराट कोहलीला भेटण्यासाठी चाहत्यांनी सुरक्षा रक्षकांचा ताफा तोडला
3 fans entered in the stadium to meet Virat Kohli and touched his feet at Arun Jaitley stadium pic.twitter.com/gLKOYhiwX4
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) February 1, 2025
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दिल्ली संघ क्षेत्ररक्षण करत आहे आणि विराट कोहली देखील मैदानात आहे. यावेळी, एक नाही तर तीन चाहते सुरक्षा घेरा तोडून मैदानात घुसले आणि विराटजवळ पोहोचले. या तिघांना पाहून विराट कोहलीही आश्चर्यचकित झाला. पाच मिनिट दिल्ली संघाच्या खेळाडूंनाही काय चालले आहे ते समजत नाही.
तीन चाहत्यांना मैदानात येताना पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले सुरक्षारक्षक लगेच सक्रिय झाले आणि मैदानात आले. सर्वांनी मिळून तिघांनाही मैदानाबाहेर काढले आणि मग सामना पुन्हा सुरू झाला. पण त्यावेळी मैदानात नुसती पळापळ चालू होती, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या तिघांपैकी 2 जण अल्पवयीन होते आणि एकाने विराट कोहलीच्या पायाला स्पर्शही केला. अशी घटना उघडकीस आल्यानंतर अरुण जेटली यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.