भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वचे क्रिकेट विश्वात सर्वच फॅन आहेत. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी-20 आणि 50 ओव्हरचा वर्ल्ड कपसह चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला आहे. आणि आता दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) धोनीच्या नेतृत्वाच्या यशाच्या खुलासा केला आहे. इंडियन प्रीमिअर लीग फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जमध्ये (Chennai Super Kings) धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या डु प्लेसिसने त्याच्या यशाचे रहस्य उघड केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएलमध्ये धोनीने चेन्नईला तीन वेळा जेतेपदाची मान मिळवून दिला आहे. आयपीएलमधील (IPL) चेन्नई सुपर किंग्जच्या(सीएसके) यशाचे मोठे कारण धोनीला रणनीती बनविण्यास मदत करण्यासाठी त्याच्या संघात आंतरराष्ट्रीय कर्णधार असण्याचे धोरण हे डु प्लेसिसचे मत आहे. डु प्लेसिस म्हणाला की, सीएसकेने गेल्या काही वर्षांत केलेले महान कार्य म्हणजे त्यांच्या आंतरराष्ट्रीय कॅप्टन संघात ठेवणे. ('मी वेडा आहे, 300 वनडे सामने खेळलो', कुलदीप यादव ने सांगितला संतप्त एमएस धोनी चा मजेदार किस्सा)
“चेन्नईने केलेल्या सर्वोत्कृष्ट कामांपैकी एक श्रेय धोनी व प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना जाते, त्यांनी ब्रॅंडन मॅक्युलम, मी, ड्वेन ब्राव्हो सारख्या कर्णधारांचा समावेश केला ज्यात रैनाचाही समावेश आहे, ज्यांनी संघाचे नेतृत्व केले आहे... कारण त्यांना असे विचार करणारे क्रिकेटर हवे होते." डु प्लेसिस म्हणाला, "त्यामुळे संघात बरेच कर्णधार होते. विचार करू इच्छिणार्या क्रिकेटपटूंचा हा अनुभव होता आणि तो यशस्वी झाला."डु प्लेसिस धोनीचे कौतुक करत म्हणाला, "चेन्नई सुपर किंग्जचा एक भाग असणे शानदार आहे. धोनीचा मजबूत नेतृत्व गट आहे. जेव्हा तो मैदानावर नसतो तेव्हा तो एक मोठी रिकामी जागा सोडतो."
यापूर्वीही त्याने म्हटले होते की धोनी नसल्यास चेन्नई संघ इतका बळकट होणार नाही. धोनीचा संघात राहणेच त्याच्या खेळाडूंना जिंकण्याचे आत्मविश्वास देते. धोनी संघात नसल्याने एक मोठी रिक्तजागा राहील.