IPL साठी सट्टेबाजी करणारा माजी क्रिकेटर  Robin Morris याला वर्सोवा  येथून अटक
(फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबई आणि ओडिसासाठी खेळणारा माजी माजी फर्स्ट क्लास खेळाडून रॉबिन मॉरिस (Robin Morris) याला पोलिसांनी वर्सोवा येथून क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी अटक केली आहे. मॉरिस याच्यासह अन्य दोन जण आयपीएलच्या सामन्यांसाठी सट्टेबाजी करत असल्याची गोष्ट उघडकीस आली आहे.भारतीय वंशाचा पण कॅनडात जन्मलेला मॉरिस याने मुंबई आणि ओडिसासाठी वर्ष 1995 आणि 2007 मध्ये सामन्यात खेळताना दिसून आला होता.(IPL 2020 Controversial Umpiring Decisions: आयपीएल13 मधील अंपायरांचे 'हे' निर्णय ठरले वादग्रस्त, पाहून तुमच्याही भुवया उंचावतील, पाहा Videos)

पोलिसांनी या प्रकरणी माहिती देत असे म्हटले आहे की, त्यांना वर्सोवातील यारी रोड येथे राहणाऱ्या मॉरिस याच्या घरी सट्टेबाजी सुरु असल्याची माहिती मिळाली. मॉरिस याच्या घरावर धाड टाकत पोलिसांनी त्याच्यासह अन्य दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मॉरिस हा सट्टेबाजी करत असताचा त्याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. अन्य दोन जणांवर आयपीसी कलम आणि जुगार अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दंडाधिकारी कोर्टाकडून त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.(IPL 2020 Betting Racket: कर्नाटक पोलिसांकडून आयपीएल बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, रॅकेट चालविण्यासाठी कॉन्स्टेबल अटक)

गेल्या वर्षात म्हणजेच 2019 मध्ये Al Jazeera TV ने एक स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यावेळी मॉरिस याच्यावर मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप लापण्यात आला होता. त्याचसोबत एका कर्ज देणाऱ्या एजेंटचे अपहरण करण्याचा आरोप सुद्धा मॉरिस याच्यावर होता. असे सांगितले होते की, 2 लाख रुपयांच्या एजेंटचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी 4 अन्य जणांना अटक करण्यात आली होती.