ENG(W) Vs IND(W) 1st ODI 2021 (Photo Credit: ICC)

England (W) Vs India (W) 1st ODI 2021: इंग्लंड महिला संघाविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत इंग्लंडच्या संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयानंतर इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी तडाखेबाज फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची निराशाजनक सुरुवात झाली. भारतीय संघाने 50 षटकात 8 विकेट्स गमावून केवळ 201 धावा केल्या. या सामन्यात भारतीय संघाकडून कर्णधार मिताली राजने संयमी खेळी दाखवली. तिने 108 चेंडूमध्ये सर्वाधिक 72 धावा केल्या. यात 7 चौकारचा समावेश आहे. इग्लंडच्या संघासमोर मोठे लक्ष्य नव्हते. त्यांनी 34.5 षटकात 2 विकेट गमावून भारताला पराभूत केले. हे देखील वाचा- ICC Men's T20 World Cup 2021: 'या' देशात टी-20 विश्वचषक होण्याची शक्यता, बीसीसीआय सचिव जय शाह यांचे मोठे वक्तव्य

आयसीसीचे ट्वीट-

त्यांनंतर इंग्लंडकडून सलामी देण्यासाठी आलेल्या टॅमी ब्यूमॉन्ट आणि ऑलराऊंडर नताली सायव्हर यांच्या शतकीय भागेदारीच्या जोरावर भारतावर विजय मिळवला आहे. ब्यूमॉन्ट 87 चेंडूत 87 धावा केल्या. यात 12 चौकार आणि एक षटकारचा समावेश आहे. तर, सायव्हरने 74 चेंडूत 74 धावा केल्या आहेत. यात 10 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.