AUS vs ENG (Photo Credit - Twitter)

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात नाणेफेक झाली नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. अशा स्थितीत आता गट एकमधील (Group 1) उपांत्य फेरीची लढत रंजक बनली आहे. न्यूझीलंड दोन सामन्यांत तीन गुणांसह अव्वल स्थानावर आहे. यासोबतच इंग्लंडचा संघ तीन सामन्यांतून तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तीन सामन्यांतून तीन गुणांसह आयर्लंड तिसऱ्या स्थानावर आहे आणि ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला नेट रनरेट आहे. त्याचबरोबर गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचेही तीन सामन्यांत तीन गुण असुन संघ चौथ्या स्थानावर गेला आहे.

श्रीलंकेचे दोन सामन्यांतून दोन गुण झाले असून संघ पाचव्या स्थानावर आहे. मात्र, श्रीलंकेचा नेट रनरेट ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि इंग्लंड या तिन्ही देशांपेक्षा चांगला आहे. अशा स्थितीत एक सामना जिंकल्यास श्रीलंकेचा संघ थेट पहिल्या स्थानावर जाईल. याचबरोबर अफगाणिस्तानचा संघ तीन सामन्यांतून दोन गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडचा पुढचा सामना 29 ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध आहे. हा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचेल. न्यूझीलंड संघ जिंकला तर ते पहिल्या स्थानावर राहील. श्रीलंकेचा संघ जिंकल्यास प्रथम स्थानावर पोहोचेल. (हे देखील वाचा: ZIM vs PAK: पाकिस्तानची धुलाई करणाऱ्या सिकंदर रझाने सांगितले यशाचे रहस्य, पाँटिंगचाही मोठा हात)

पावसामुळे सामना वाहून गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल आणि त्या स्थितीत श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावर जाईल. ऑस्ट्रेलियाला पुढील सामना 31 ऑक्टोबरला आयर्लंडविरुद्ध, पुढील सामना 1 नोव्हेंबरला अफगाणिस्तान, 1 नोव्हेंबरला श्रीलंका, 1 नोव्हेंबरला इंग्लंडचा पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे.