![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/ind-vs-eng-18-.jpg?width=380&height=214)
India National Cricket Team vs England National Cricket Team: भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे, त्यातील दुसरा सामना (IND vs ENG 2nd ODI 2025) आज कटकमधील बाराबती स्टेडियमवर (Barabati Stadium, Cuttack) खेळला जात आहे. टीम इंडियाने (Team India) पहिला एकदिवसीय सामना 4 विकेट्सने जिंकला होता आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दरम्यान, इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून वरुण चक्रवर्तीचे वनडेमध्ये पदार्पण केले आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 305 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
2ND ODI. WICKET! 49.5: Mark Wood 0(1) Run Out K L Rahul, England 304 all out https://t.co/NReW1eEQtF #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 9, 2025
डकेट-रूटने ठोकले अर्धशतक
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघाला चांगली सुरुवात मिळाली. बेन डकेट (65) आणि जो रूट यांनी (69) अर्धशतके झळकावली. त्यानंतर जोस बटलर (34) लियाम लिव्हिंगस्टोन नाबाद 41 धावांच्या जोरावर इंग्लडने 49.5 षटकात 10 विकेट गमावून 304 धावा केल्या. (हे देखील वाचा: IND vs ENG 2nd ODI 2025: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरताच रोहित शर्माने रचला इतिहास, कर्णधार म्हणून केला 'हा' मोठा पराक्रम)
जडेजाने घेतल्या तीन विकेट
दुसरीकडे भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीव विकेट घेतल्या. तसेच मोहम्मद शमी, हर्षित राणा, हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. भारताला मालिका जिंकण्यासाठी 50 षटकात 305 धावा करायच्या आहे. तर इंग्लडंला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल