India National Cricket Team vs England National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs ENG) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील चौथा टी20 सामना 31 जानेवारी (शुक्रवार) रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,(Maharashtra Cricket Association) पुणे येथे खेळला गेला. हा सामना असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिका 3-1 अशी जिंकली. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदने (Saqib Mahmood) आपल्या घातक गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना हादरवून टाकले. महमूदला मालिकेत मार्क वूडच्या जागी पहिली संधी मिळाली आणि तो येताच त्याने भारतीय फलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त केला. (Hardik Pandya Milestone: इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 मध्ये हार्दिक पंड्याने इतिहास रचला, 'हा' विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय)
पहिल्याच षटकात भारताला तीन धक्के
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने दुसऱ्याच षटकात साकिब महमूदला गोलंदाजी करायला लावली आणि तो येताच खळबळ उडवून दिली. त्याच्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसन (१ धाव) शॉर्ट बॉलचा बळी पडला. पुढच्याच चेंडूवर फॉर्ममध्ये असलेल्या तिलक वर्मा गोल्डन डकवर बाद झाला. यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला, ज्यामुळे भारताची परिस्थिती खूपच नाजूक बनली. साकिब महमूदने त्याच्या पहिल्याच षटकात तीन विकेट घेणारी मेडन टाकून इतिहास रचला आणि भारतीय फलंदाजीला धक्का दिला.
साकिब महमूदचा ऐतिहासिक रेकॉर्ड
साकिब महमूद हा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताविरुद्ध एका षटकात तीन विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला. याशिवाय, तो कोणत्याही संघाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ही कामगिरी करणारा पहिला इंग्लिश गोलंदाज बनला आहे. तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ट्रिपल विकेट मेडन (षटकांच्या बाबतीत) टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला. त्याच्या आधी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेरोम टेलरने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा पराक्रम केला होता.