पहिला T20 सामना 11 सप्टेंबर (बुधवार) रोजी साउथॅम्प्टन येथील रोज बाउल स्टेडियमवर खेळवला जाईल. स्कॉटलंडचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध तुल्यबळ लढतीत अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. मात्र, स्कॉटलंडपेक्षा इंग्लंडचा संघ खूपच सरस आहे. त्यामुळे स्फोटक मालिकेची अपेक्षा आहे. या दोन्ही संघांमधील गेल्या पाच सामन्यांमध्ये इंग्लंडने दोनदा तर ऑस्ट्रेलियाने एकदा विजय मिळवला आहे. पावसामुळे दोन सामने वाहून गेले. सर्वात अलीकडील सामना T20 विश्वचषक 2024 मध्ये होता, जो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. या सामन्यापूर्वी इंग्लंडने आपले प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहे.  (हेही वाचा - Bangladesh Training Video: टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बांगलादेश क्रिकेट संघाने मीरपूरमध्ये घाम गाळला)

टी-20 मालिकेपूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे बाहेर आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत फिल सॉल्ट संघाचे नेतृत्व करेल. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) ही माहिती दिली आहे. जोस बटलरच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो बाहेर आहे. जॉस बटलरच्या जागी स्टार अष्टपैलू जेमी ओव्हरटनचा T20 संघात समावेश करण्यात आला आहे. अशा स्थितीत जोस बटलरशिवाय ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर देण्याचा इंग्लंडचा संघ प्रयत्न करेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

पाहा पोस्ट -

इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघाची प्लेइंग इलेव्हन: फिल सॉल्ट, विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, सॅम कुरन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद, रीस टोपली,

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चुरशीच्या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. या सामन्यात जॉर्डन कॉक्स, जेकब बेथेल आणि जेमी ओव्हरटन इंग्लंडसाठी पहिला टी-२० सामना खेळणार आहेत.