ENG vs WI 2nd Test Match: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना ट्रेंट ब्रिज येथे झाला. या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी 385 धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. दरम्यान, इंग्लंड संघाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. दुसऱ्या कसोटीत ऑली पोपच्या 121 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात 416 धावा केल्या. पोपशिवाय बेन डकेटने 71 आणि बेन स्टोक्सने 69 धावांचे योगदान दिले. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात 425 धावा केल्या. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात रुटने 122 आणि ब्रुकने 109 धावा केल्या. (हे देखील वाचा: IND vs SL T20I Series 2024: टी-20 मालिकेत टीम इंडियाच्या 'या' महान खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा, जाणून कोण आहे ते...)
With his hundred against West Indies in the second Test, Joe Root sits one behind Alastair Cook in the all-time England record for most Test centuries 👊#WTC25 | #ENGvWI
More ⬇https://t.co/TYiFgwqU2e
— ICC (@ICC) July 21, 2024
इंग्लंडने प्रथमच केला हा मोठा पराक्रम
कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात प्रथमच इंग्लंड संघाने दोन्ही डावात 400 हून अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंड संघ 1877 पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे. मेलबर्नमध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळला. आतापर्यंत इंग्लंड संघाने 1073 कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला आहे, परंतु त्यांना दोन्ही डावात 400 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. त्याचवेळी, कसोटी क्रिकेटमधील ही 12वी वेळ आहे, जेव्हा कसोटी खेळणाऱ्या संघाने दोन्ही डावात 400 हून अधिक धावा केल्या आहेत.
जो रूटने केली विक्रमांची मालिका
या सामन्याच्या तिसऱ्या डावात इंग्लंडचा फलंदाज जो रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 32 वे शतक झळकावले आहे. यासह तो इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या पुढे ॲलिस्टर कुक आहे. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने शिवनारायण चंद्रपॉलला मागे टाकले आहे. शिवनारायण चंद्रपॉलने आपल्या कसोटी कारकिर्दीत 11867 धावा केल्या आहेत, तर रुटच्या आता 11940 धावा आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 8व्या स्थानावर पोहोचला आहे.