England Women National Cricket Team vs South Africa Women National Cricket Team Match Scorecard: इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ 2024 ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील नववा सामना आज शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव करून गट टप्प्यात आणखी एक महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 124 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात इंग्लंडने 19.2 षटकांत 125 धावा करत सामना जिंकला. नॅट सिव्हर-ब्रंटने नाबाद 48 धावा करत इंग्लंडचा विजय निश्चित केला. (हेही वाचा - ENG W vs SA W, 2024 ICC Women’s T20 World Cup Scorecard: दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने इंग्लंडसमोर ठेवले 125 धावांचे लक्ष्य, लॉरा वोल्वार्डने खेळली कॅप्टन इनिग, पाहा पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड)
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने सर्वाधिक 42 धावा केल्या. त्याने 39 चेंडूत आपली खेळी खेळली आणि यादरम्यान त्याने 3 चौकार मारले. याशिवाय, मॅरिझान कॅपने 26 धावा केल्या, तर ॲनेरी डेर्कसेनने 20 धावांची नाबाद खेळी केली. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा संघ सुरुवातीपासूनच दडपणाखाली होता आणि अखेरच्या षटकांमध्ये विकेट गमावल्यामुळे त्यांना 124 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडच्या गोलंदाजीत सोफी एक्लेस्टोनने 4 षटकात 15 धावा देत 2 बळी घेतले. सारा ग्लेननेही प्रभावी कामगिरी करत 18 धावांत 1 बळी घेतला, तर चार्ली डीनने 25 धावांत 1 बळी घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या डावात इंग्लंडने दमदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या गाठण्यापासून रोखले.
लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली. डॅनी व्याटने 43 चेंडूत 43 धावा केल्या आणि त्याच्या डावात 4 चौकारांचा समावेश होता. तसेच, नॅट सिव्हर-ब्रंटने नाबाद 48 धावा करत इंग्लंडचा विजय निश्चित केला. तीने 36 चेंडूत आपली खेळी खेळली आणि तो शेवटपर्यंत क्रीजवर राहिला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीत मारिझान कॅपने 17 धावांत 1 बळी घेतला, तर नॉनकुलुलेको म्लाबा आणि नदिन डी क्लर्क यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला. या विजयासह इंग्लंडने स्पर्धेतील आपले स्थान मजबूत केले आहे. इंग्लंडचा संघ या स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे या सामन्याने सिद्ध केले.