इंग्लंड (England)-वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) 24 जुलैपासून कसोटी मालिकेतील अंतिम सामना खेळला जाईल. विंडीजने पहिला आणि इंग्लंडने दुसरी टेस्ट जिंकत तीन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत झाली आहे. आणि मालिकेच्या निर्णायक सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनची (James Anderson) त्याचा वेगवान गोलंदाज साथीदार स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) बरोबर जोडी बनावी अशी त्याची इच्छा आहे. शुक्रवारी मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू होणाऱ्या तिसर्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात अँडरसन, जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड हे संघात पुनरागमन करण्यासाठी पाहत आहेत. तथापि, सोमवारी संपलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या 113 धावांच्या विजयात ब्रॉड, सॅम कुर्रान आणि क्रिस वोक्स या सर्वांनी सकारात्मक योगदान दिले. अँडरसनला वाटते की, विंडीजविरुद्ध निर्णायक कसोटीत मालिका जिंकण्यासाठी आपल्याला आणि स्टुअर्ट ब्रॉडला एकत्र गोलंदाजीचे नेतृत्व करावे लागेल. (ENG vs WI 3rd Test: वेस्ट इंडीजविरुद्ध तिसर्या टेस्टसाठी बेन स्टोक्सला मिळू शकते विश्रांती, इंग्लंडचे प्रशिक्षकाने दिले संकेत)
"मी असे मानतो की सर्वोत्तम तीन खेळाडू खेळतील पण जो आणि क्रिससाठी हा एक कठीण निर्णय असणार आहे आणि तेथे काही निराश लोक असतील," अँडरसनने पत्रकार परिषदेत म्हटले. अँडरसन आणि 34 वर्षीय ब्रॉड पुन्हा एकत्र गोलंदाजी करणार नाहीत असे संकेत देण्यात आले पण, अँडरसनला असे होऊ नये अशी आशा आहे. "आमका एकत्र रेकॉर्ड सांगतो आणि मला असे वाटते की जर आम्ही दोघे तंदुरुस्त आहोत आणि इंग्लंडने सर्वोत्तम गोलंदाज निवडले तर आम्ही दोघे त्यात सामील होऊ,” तो म्हणाला.
Will we get to see James Anderson and Stuart Broad together in the final #ENGvWI Test?
Here's what Anderson has to say 👇https://t.co/WlWM0tylk2 pic.twitter.com/hPLECkuGl1
— ICC (@ICC) July 23, 2020
निर्णायक सामना आणि पाकिस्तान संघाविरुद्ध तीन सामन्यांची मालिका समोर असताना इंग्लंड गोलंदाजांच्या कामाचा ताण टाळण्यासाठी वेगवान गोलंदाजांना व्यवस्थित रोटेट करण्याचा विचार करेल. शुक्रवारी सुरू होणार्या तिसर्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या प्लेयिंग इलेव्हनच्या निवडीचा पेच कायम आहे. अँडरसनसह आर्चर आणि मार्क वूडचे संघात पुनरागमन अपेक्षित आहे. शिवाय, दुसऱ्या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेला बेन स्टोक्सला विश्रांती देण्याचे यापूर्वी इंग्लंड कोचने संकेत दिले होते.