बाबर आजम (Photo Credit: Getty)

इंग्लंडविरुद्ध (England) नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला (Pakistan) 1-0 ने पराभव पत्करावा लागला. मॅन्चेस्टरमधील (Manchester) पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडने विजय मिळवला तर साउथॅम्प्टन येथील दोन्ही सामने पावसामुळे अनिर्णित राहिले. कसोटी मालिकेनंतर आता 28 ऑगस्ट, आजपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. मर्यादित षटकांचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आता इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेमध्ये शतक झळकावण्यासाठी इच्छूक आहे. इंग्लंडविरुद्ध अवघड टप्प्यातून आपल्या संघाला बाहेर काढण्यासाठी त्याने काही अर्धशतकाचे मोठ्या खेळीत रूपांतर केले नाहीत याची आझम निराशा आहे. तथापि, आता तो आपल्या चुकांमधून शिकला आहे आणि येत्या टी-20 मालिकेमध्ये इंग्लंडविरुद्ध आणखी मजबूत होईल याची त्याला खात्री आहे.  (ENG vs PAK T20 2020: इंग्लंडविरुद्ध पाकिस्तान टी-20 टीम घोषित; नसीम शाह, हैदर अली यांना संधी, माजी कर्णधार सरफराज अहमदचे पुनरागमन)

“टी-20 मध्ये शतक ठोकणे हे माझ्या अन्य लक्ष्यांपैकी एक आहे आणि खरे सांगायचे तर या मालिकेतील एक शतक ठोकण्याचे माझे ध्येय आहे. हे निराशाजनक आहे की मी माझ्या धावा मोठ्या स्कोअरमध्ये रूपांतरित करू शकलो नाही, परंतु मी या चुकांमधून शिकेन. आगामी मालिकेत चांगले होण्यासाठी मी त्यांचे विश्लेषण केले आहे,” असे बाबरने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

इंग्लंड-पाकिस्तानमधील पहिला सामना 28 ऑगस्ट, तर दुसरा सामना 20 ऑगस्ट आणि शेवटचा सामना 1 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. पीएसएलमध्ये दाखवलेल्या शादाब खानच्या हुशार कौशल्यांचे बाबर आझमने कौतुक केले. येत्या काही दिवसांत संभाव्य फलंदाज होण्यासाठी नेटमध्ये तयारी करणाऱ्या टीमचा अंडर-19 स्टार हैदर अलीचीही त्याने प्रशंसा केली. बाबर म्हणाला की, आगामी टी-20 मालिकेत खान आणि अलीच्या प्रतिभेचा अत्यंत उत्तम वापर करण्यासाठी तो उत्सुक आहे.