ENG vs IRE 3rd ODI: कर्णधार इयन मॉर्गनचा एमएस धोनीला दे धक्का, तिसऱ्या वनडे सामन्यात शतक झळकावत नोंदवला अनोखा विक्रम
इयन मॉर्गन आणि एमएस धोनी (Photo Credit: Facebook)

इंग्लंडचा व्हाइट बॉलचा कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) कर्णधारपदा म्हणून सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या विक्रमाला मागे टाकले. इंग्लंडच्या या क्रिकेटपटूने साऊथॅम्प्टनमधील (Southampton) एजस बाऊलमध्ये आयर्लंडविरुद्ध (Ireland) 47 व्या वनडे अर्धशतका दरम्यान या विक्रमला गवसणी घातली. मालिकेच्या तिसर्‍या आणि अखेरच्या वनडे सामन्यादरम्यान मॉर्गनने 12 व्या षटकात जोशुआ लिटलसागच्या शॉर्ट बॉलवर पुलशॉट मारला. या शतकारासह मॉर्गनच्या आंतरराष्ट्रीय षटकारांची संख्या 212 झाली आहे, तर धोनीने आंतराष्ट्रीय सामन्यात कर्णधार म्हणून 211 षटकात ठोकले आहेत. आयर्लंडविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात फटकेबाजी करताना मॉर्गनने धोनीला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.मॉर्गनने 163 तर धोनीने सर्व फॉरमॅट मिळून 332 सामन्यात हा पराक्रम केला होता. एकूणच मॉर्गनने 16 सामन्यांत 6 षटकार लगावले. कारकीर्दीत 325 आंतरराष्ट्रीय षटकारांसह तो जागतिक क्रिकेटमध्ये आठव्या स्थानावर आहे. (सुरेश रैनाने एमएस धोनी-रोहित शर्माची केली तुलना, पुढचा धोनी म्हणून टॅग केल्यावर 'हिटमॅन' म्हणाला-'असं होऊ नये')

सामान्याविषयी सांगायचं झालं तर आयर्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि इंग्लंडविरुद्ध फलंदाजीसाठी जोरदार सुरुवात केली आणि जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो या दोन सलामी फलंदाजांना एकच आकडी धावसंख्येवर माघारी धाडले. तथापि, मॉर्गनच्या स्फोटक शोच्या जोरावर इंग्लंडने खेळामध्ये आयर्लंडची चांगलीच धुलाई केली. मालिकेतील पहिले दोन सामन्यात इंग्लंडने बाजी मारली तर अखेरच्या सामन्यात आयर्लंडने विजय मिळवला. इंग्लंडने 2-1 ने मालिका खिशात घातली. मॉर्गनने 106 धावांचा डाव खेळला. टॉम बॅंटनने त्याला चांगली साथ दिली आणि 58 धावा करून तो देखील बाद झाला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंगने कर्णधार म्हणून 324 सामन्यात 171 अंतरराष्ट्रीय षटकारांसह तिसर्‍या स्थानावर, न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम 170 आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स 135 षटकारांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा क्रिस गेलच्या नावावर आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी 476 षटकारांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे तर धोनी 359 षटकारांसह 5 व्या स्थानावर आहे. मॉर्गन 324 षटकारांसह 8 व्या स्थानावर आहे.