
Shikhar Dhawan Auto Biography: शिखर धवनने त्याच्या 'द वन: क्रिकेट, माय लाईफ अँड मोर' या आत्मचरित्रात अनेक जुने किस्से शेअर केले आहेत. त्यात त्याने त्याच्या प्रेम प्रकरणांवर देखील प्रकाश टाकला. हॉटेलच्या खोलीत तो त्याच्या गर्लफ्रेंडला गुपचूप घेऊन जायचा हे सांगितले. यासगळ्यात रोहित (Rohit Sharma) खूप रागवायचा याचाही उल्लेख त्याने केलाय. वेळी धवन (Shikhar Dhawan) रोहित शर्मासोबत त्याची खोली शेअर करायचा. या काळात त्याने खुलासा केला की रोहितला धवन त्याची प्रेयसी खोलीत येणे अजिबात आवडत नव्हते. त्याने हे देखील सांगितले की त्यांच्या नात्याची बातमी संपूर्ण संघात कशी पसरली होती.
तयावेळी धवन तिच्या प्रेमात इतकी बुडाला होता की त्याला ती खूप सुंदर वाटत होती. ती त्याच्या साठीच बनली आहे आणि तो तिच्याशी लग्न करण्यास तयार झाला होता.
शिखर धवन
भारत अ संघाचा 2006 चा ऑस्ट्रेलिया दौरा धवनसाठी खूप चांगला होता. जिथे त्याने मैदानावर चांगली सुरुवात केली होती. परंतु त्याने हे देखील कबूल केले की तो गर्लफ्रेंडसोबत जास्त वेळ घालवू लागला तेव्हा तो विचलित झाला आणि नंतर त्याचा खेळ खराब झाला. गर्लफ्रेंडचे नाव त्याने एलेन असे सांगितले.
त्याने पुढे लिहिले की,
मी सराव सामन्यात अर्धशतक ठोकून सुरुवात केली आणि माझा दौरा चांगला चालला होता. प्रत्येक सामन्यानंतर, मी एलेनला (तिचे खरे नाव नाही) भेटायचो आणि तिला माझ्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाऊ लागलो. जिथे मी रोहित शर्मासोबत रूम शेअर करत होतो. कधीकधी रोहित हिंदीत तक्रार करायचा, "तू मला झोपू देणार आहे का?"
यानंतर, निवडकर्त्यांनी त्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पाहिले तेव्हा धवनचे नाते संपूर्ण संघाच्या लक्षात आले. धवन पुढे लिहितो की एका संध्याकाळी सोबत जेवत होतो आणि ती माझ्या खोलीत असल्याची बातमी संपूर्ण संघात वाऱ्यासारखी पसरली.
आमच्यासोबत दौऱ्यावर असलेल्या एका वरिष्ठ राष्ट्रीय निवडकर्त्याने आम्हाला लॉबीमध्ये हातात हात घालून चालताना पाहिले. मी कोणताही गुन्हा करत नसल्यामुळे तिचा हात सोडावा असे मला कधीच वाटले नाही. जर मी सातत्याने चांगली कामगिरी करत राहिलो तर मी वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवू शकेन अशी चांगली संधी माझ्याकडे होती, परंतु माझी कामगिरी घसरतच राहिली.