![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/03/Hanuma-Vihar-Team-IND-380x214.jpg)
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव गेल्या महिन्यात आयोजित करण्यात आला, जिथे देश-विदेशातील 500 पेक्षा अधिक खेळाडूंवर बोली लावण्यात आली. युवा खेळाडूंपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या खेळाडूंना फ्रँचायझींनी आपल्या ताफ्यात सामील केले. अनेक खेळाडूंना मोठी रक्कम मिळाली तर काही खेळाडूंना कवडीमोल भावही मिळाला नाही. या लिलावात सुरेश रैना, हनुमा विहारी (Hanuma Vihari), अमित मिश्रा आणि इशांत शर्मा यांच्यासारखी मोठी नावे अनसोल्ड राहिली. आता यापैकी काही खेळाडू ढाका प्रीमियर लीगमध्ये (Dhaka Premier League) आपला खेळ दाखवण्यासाठी सज्ज आहेत. भारताचा नवीन कसोटी नंबर 3 फलंदाज विहारी आणि बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Eswaran) असे एकूण 7 खेळाडूंमध्ये ढाका प्रीमर लीग वनडे स्पर्धा खेळणार आहेत.
26 मार्चपासून सुरू होणार्या आयपीएल 2022 साठी न निवडलेल्या देशांतर्गत भारतीय क्रिकेटपटूंसाठी DPL एकदिवसीय स्पर्धेची संधी विनामूल्य विंडोमध्ये आहे, वृत्तसंस्था पीटीआयने सांगितले. दरम्यान, परवेज रसूल, बाबा अपराजित, अशोक मेनारिया, चिराग जानी आणि गुरिंदर सिंह हे 11 संघांच्या स्पर्धेत सहभागी झालेले अन्य भारतीय क्रिकेटपटू आहेत. श्रीलंकेवर भारताच्या 2-0 अशा धुवांदर विजयानंतर हनुमाने अबाहानी लिमिटेडशी करार केला आणि हैदराबादमध्ये थोड्या विश्रांतीनंतर तो त्यांच्या संघात सामील होण्याची अपेक्षा आहे. विहारीचा अलीकडेच चेतेश्वर पुजाराच्या जागी संघात समावेश करण्यात आला असून त्याने संपूर्ण मालिकेच्या तीन डावात 41.33 च्या सरासरीने 124 धावा केल्या. ढाका प्रीमियर लीगमध्ये भारतीय खेळाडू खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. रसूल, मेनारिया आणि अपराजित यांच्यासह विहारी व अभिमन्यू ईश्वरन याआधी स्पर्धेत खेळले आहेत. याशिवाय दिनेश कार्तिक, मनोज तिवारी आणि युसूफ पठाण हे देखील या लीगचा भाग असतील.
दुसरीकडे बंगालचा कर्णधार अभिमन्यू 2017 आणि 2019 नंतरच्या तिसऱ्या सत्रासाठी क्रिकेट क्लबमध्ये परतला होता. ही एक निमंत्रित स्पर्धा आहे आणि अभिमन्यूला दीड महिना चालणाऱ्या या स्पर्धेसाठी ढाका येथे जाण्यासाठी सोमवारी BCCI ची मंजुरी मिळाली. ढाका प्रीमियर लीगच्या आगामी हंगामात प्रत्येक संघातून फक्त एका विदेशी खेळाडूला खेळण्याची संधी दिली जाईल.