नसीम शाह (Naseem Shah) याने वयाच्या 16 व्या वर्षी ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये पाकिस्तान (Pakistan) कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ज्यानंतर क्रिकेटविश्वात नसीमच्या वयाबद्दल वाद सुरु झाला आहे. अनेक दिग्गजांनी म्हटले आहे की नसीमचे वय 16 वर्षांपेक्षा जास्त आहे. या वादावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आता प्रतिक्रिया दिली आहे आणि भारतावर निशाणा साधला आहे. भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याने 16 वर्षाच्या वेगवान गोलंदाज नसीमबद्दल बोलत असलेल्या पाकिस्तानी पत्रकाराचे ट्विट शेअर केले. आपल्या ट्विटमध्ये कैफने लिहिले की, 'गोलंदाज मागे वयाने वयस्कर असल्याचे दिसते.' 2016 चा एक लेख, ज्यामध्ये वेस्ट इंडिजचा दिग्गज अॅन्डी रॉबर्स यांनी पाकिस्तानच्या 17 वर्षाच्या वेगवान गोलंदाजांविषयी बोलले ज्याचे नावही नसीम शहाच आहे. हा लेख यूजर्सने सोशल मीडियावर शेअर केला. (AUS vs PAK 1st Test: ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट खेळणारा नसीम शाह बनला सर्वात युवा क्रिकेटपटू, कसोटी कॅप मिळताच झाले अश्रू अनावर, पाहा Video)
ऑस्ट्रेलियाच्या न्यूज नेटवर्क नाईन मधील एका अहवालानुसार पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान (Wasim Khan) यांनी ऑस्ट्रेलियन मीडिया आउटलेट 'द टोंक'शी बोलले, ज्यात त्यांनी नसीमच्या वयावरील शंका नाकारली. “तुम्हाला फक्त त्याचा चेहरा पाहण्याची गरज आहे. त्याच्या वयावर विचारपूस केली जात आहे कारण तो प्रौढ दिसत आहे. याखेरीज आता असा प्रश्न या कारणाने उपस्थित केला जात आहे की इतक्या लहान वयात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो फक्त 16 वर्षांचा आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. भारत काय विचार करतो याची आम्हाला खरोखर काळजी नाही.”
पाहा कैफचे ट्विट
Looks a terrific prospect. But is 16 now, aging backwards i think https://t.co/frlg06ZIFk
— Mohammad Kaif (@MohammadKaif) November 22, 2019
दरम्यान, दुसर्या डावात बाबर आझम याची झुंजार शतकी व्यर्थ गेली. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर डाव आणि 5 धावांनी सहज विजय मिळवून मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी मिळविली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला सामना खेळत असलेल्या असीमला 1 विकेट मिळाली. पण, पहिली टेस्ट कॅप घेतानाच त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. पण, त्याच्या खेळाशिवाय त्याच्या वयावरुन निर्माण झालेल्या शंकांनी सर्वांचे लक्ष वेधले.