शिखर धवन आणि आयशा मुखर्जी (Photo Credit: Instagram)

भारतीय सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) त्याची पत्नी आयशा मुखर्जीसोबत (Ayesha Mukherjee) घटस्फोट (Divorce) घेतला आहे. आयशाने तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. 2012 मध्ये धवन आणि आयेशा विवाहबंधनात अडकले आणि 2014 मध्ये या जोडप्याने एका मुलाला जन्म दिला. लग्नाच्या 9 वर्षानंतर जोडप्याने घेतलेला हा निर्णय अत्यंत धक्कादायक आहे. मात्र, यावर अद्याप धवनची प्रतिक्रिया आली नाही. आयशाचा  याआधी पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला असून, तिला पहिल्या लग्नामधून 2 मुली आहेत.

जेव्हा धवनने त्याच्यापेक्षा सुमारे 10 वर्षांनी मोठ्या आयेशाशी लग्न केले, तेव्हा त्याला खूप टोमणे मारले गेले होते. मात्र, धवनच्या कुटुंबीयांनी त्याला पाठिंबा दिला. 2014 मध्ये शिखर व आयेशा या जोडप्याला ‘जोरावर’ नावाचा मुलगा झाला. आयशाशी लग्न केल्यानंतर आपले आयुष्य कसे बदलले याबद्दल धवनने वेळोवेळी भाष्य केले आहे. आयशाला भेटल्यानंतर एक व्यक्ती आणि क्रिकेटपटू म्हणून आपण बदललो असल्याचे त्याने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aesha Mukerji (@apwithaesha)

आयशाने घटस्फोटाबद्दल इंस्टाग्रामवर लिहिले आहे की, ‘एकदा घटस्फोट झाल्यावर असे वाटले की दुसऱ्यांदा बरेच काही पणाला लागले आहे. मला बरेच काही सिद्ध करायचे होते. म्हणून जेव्हा माझे दुसरे लग्न मोडले तेव्हा ते खूप भीतीदायक होते. मला वाटले की घटस्फोट हा एक घाणेरडा शब्द आहे पण तेव्हा  मी दुसऱ्यांदा घटस्फोट घेतला. शब्दांचे किती शक्तिशाली अर्थ आणि कनेक्शन असू शकतात हे मजेदार आहे आणि हे घटस्फोटित म्हणून मला स्वतःच्या अनुभवावरून समजले.’ (हेही वाचा: ENG Vs IND: भारताच्या ऐतिहासिक कामगिरीवर क्रिकेटपटूंनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया)

दरम्यान, घटस्फोटासंदर्भात धवनने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्याने कोणतेही विधान जारी केले नाही किंवा सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. यापूर्वी असे वृत्त आले होते की, शिखर आणि आयशा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. एवढेच नाही तर आयशाने तिच्या फीडमधून शिखरचे सर्व फोटो हटवले आहेत. शिखर धवन या महिन्यात UAE मध्ये IPL-2021 च्या दुसऱ्या टप्प्यात खेळताना दिसणार आहे. तो दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करतो.