Dinesh Karthik And Yuzvendra Chahal (Photo Credit - Twitter)

टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 WC 2022) उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर सर्वत्र वातावरण चांगलेच तापले आहे. काही जण स्पर्धेशी संबंधित खुलासे करत आहेत तर काहींना काढून टाकले जात आहे. दरम्यान, दिनेश कार्तिकनेही (Dinesh Karthik) एक मोठे गुपित उघड केले आहे. टीम इंडियाच्या अनुभवी यष्टीरक्षक फलंदाजाने युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) विश्वचषकाच्या कोणत्याही सामन्यात न खेळवण्याबाबत मोठी माहिती दिली आहे. चहल आणि अगदी हर्षल पटेलला (Harshal Patel) कोणत्याही सामन्याच्या प्लेइंग 11 मध्ये का स्थान देण्यात आले नाही हे कार्तिकने स्पष्टपणे सांगितले आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सने पराभूत झाल्यानंतर युझवेंद्र चहलला का खेळवण्यात आले नाही, हेच प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहेत. या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते.

कार्तिकने सांगितले कारण

दिनेश कार्तिकने सांगितले की, युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल या दोघांनाही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सांगण्यात आले होते की, परिस्थितीने परवानगी दिली तरच तुम्हाला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळेल. अन्यथा दोघांनाही बाकावर बसावे लागू शकते. ही माहिती दोन्ही खेळाडूंना माहीत होती त्यामुळे त्यांच्या मनात कोणतीही शंका किंवा प्रश्न नसल्याने ते निराश झाले नाहीत आणि त्यांच्यात आत्मविश्वास होता. अशा परिस्थितीत दोघांनाही जाणीव होती आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आपले सर्वोत्तम प्रदर्शन करतील, अशा पद्धतीने ते तयारी करत होते, एकही सामना त्यांना मिळणार नाही अशी परिस्थिती असू शकते हेही त्यांना माहीत होते. (हे देखील वाचा: BCCI कडून Chief Selector Chetan Sharma यांच्यासह नॅशनल सिलेक्शन कमिटी ची हाकालपट्टी; नव्या सिलेक्टर साठी अर्जही मागवण्यास सुरूवात)

प्रशिक्षक आणि कर्णधाराला द्यावे लागणार उत्तर!

बरं, कार्तिकने सांगितले की संघात काय वातावरण आहे, पण जेव्हा इंग्लिश फलंदाज मनगट स्पिनर्ससमोर त्रस्त असतात, तेव्हा चहलला जागा का मिळाली नाही? हा प्रश्नाचे उत्तर संघातील अन्य कोणी खेळाडू नाही तर कर्णधार किंवा प्रशिक्षक स्वत: देवु शकतात. आता विश्वचषकातील पराभवाची आढावा बैठकही बीसीसीआय घेणार आहे. अशा परिस्थितीत प्रशिक्षक आणि कर्णधार काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.