India's Worst ODI Performance 2024: भारतीय क्रिकेट संघाने 2024 मध्ये टी20 विश्वचषक(World Cup) जिंकला. असे असूनही रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि टीम इंडियासाठी हे वर्ष खूपच निराशाजनक ठरले. संघाने खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅट टी 20 मध्ये वर्चस्व राखले. पण कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये निराशाजनक कामगिरी केली. अलीकडेच भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. याशिवाय सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडिया (Team India)ऑस्ट्रेलियापेक्षा 1-2 ने पिछाडीवर असून तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न शिल्लक राहिले आहे.
मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताने 45 वर्षांनंतर वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात वाईट कामगिरी केली. टीम इंडियाने 2024 मध्ये एकही वनडे सामना जिंकला नाही. भारताचा सामना बरोबरीत सुटला. तर दोनमध्ये त्यांना श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. (हेही वाचा:ICC Women's Batting Rankings: आयसीसी महिला फलंदाजी क्रमवारीत हेली मॅथ्यूज टॉप 10 मध्ये, जेमिमाह रॉड्रिग्स आणि ऋचा घोष यांचीही मोठी झेप)
शेवटची वेळ 1979 मध्ये घडली
2024 मध्ये भारताच्या क्रिकेट कॅलेंडरमध्ये खूप कमी एकदिवसीय सामने झाले. 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये टीम इंडीया फक्त तीन सामने खेळली. 2024 मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध भारताबाहेर एकमेव एकदिवसीय मालिका खेळली. 1979 नंतर भारताने एकही वनडे जिंकल्याशिवाय एक वर्ष पूर्ण करण्याची ही चौथी वेळ होती.