Kapil Dev (Photo Credits: IANS)

भारताचे माजी क्रिकेटर कपिल देव (Cricketer Kapil Dev) यांना हृद्यविकाराचा त्रास जाणवू लागल्याने काल दिल्लीच्या Fortis Escorts Heart Institute हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. दरम्यान छातीत वेदना होत असल्याची तक्रार घेऊन आलेल्या कपिल देव यांच्यावर 23 ऑक्टोबरच्या रात्री 1 वाजता तातडीने coronary angioplasty करण्यात आली आहे. सध्या ते अतिदक्षता विभागात दाखल आहेत. त्यांना Dr Atul Mathur यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील काही दिवसांत त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो अशी माहिती दिल्लीच्या Fortis Escorts कडून देण्यात आली आहे.

आज सकाळपासूनच कपिल देव यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या बातम्या समोर आल्याने अनेक नेटकर्‍यांनी, खेळाडूंनी त्यांच्या रसिकांनी प्रकृतीमध्ये सुधार व्हावा तसेच दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.

ANI Tweet

कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने 1983 साली पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. वर्ल्डकपच्या सामन्यात त्यांनी 175 धावांची खेळी करत ऐतिहासिक कामगिरी बजावली होती. भारतीय क्रिकेट क्षेत्रातील महान खेळाडू कपिल देव यांनी इंटरनॅशनल सामन्यांमध्ये 131 टेस्ट, 225 वन डे सामने खेळले आहेत. तर टेस्ट मध्ये 5248 धावा 434 विकेट्स आहेत. 8 फेब्रुवारी 1994 साली 432 वी विकेट घेत जगात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान पटकावला होता.