
DC vs KKR TATA IPL 2025 48th Match: टाटा आयपीएल 2025 (IPL 2025) चा 48 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. दिल्लीने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 6 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्ससाठी आजचा सामना 'करो या मरो' असणा आहे आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 3 विजय, 5 पराभव आणि एक सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रोवमन पॉवेल, हर्षित राणा, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा, मुकेश कुमार