ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स (Photo Credit: Instagram)

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्स (Dean Jones) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत (Mumbai) निधन झाले आहे. ते 59 वर्षाचे होते. जोन्स यांनी 1984 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि आपल्या कारकीर्दीत एकूण 52 कसोटी आणि 164 एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी 1994मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. जोन्स त्यांच्या कमेंटरीसाठी खूप प्रसिद्ध होते आणि त्यांच्या मृत्यूच्या बातमीने क्रिकेट जग थक्क झाले आहे. मृत्यूच्या वेळी ते मुंबईत होते आणि इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्रातील कमेंटरी टीमचा भाग होते. जोन्सच्या मृत्यूवर (Dean Jones Death) सर्व दिग्गज क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. जोन्स सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव होते. एक महान फलंदाज होण्याव्यतिरिक्त ते एक महान क्रिकेट तज्ञ देखील होते. ते क्रिकेट संघ आणि जगभरातील खेळाडूंवर आपले मत उघडपणे प्रकट करायचे. (Dean Jonas Passes Away: ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि भाष्यकार डीन जोन्स यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास)

कमेंटरी पॅनेलचे इतर सदस्य ब्रेट ली आणि स्कॉट स्टायरिस यांच्यासह माजी क्रिकेटपटू जोन्स मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जैव-सुरक्षित बबलमध्ये राहत होते. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते समालोचक म्हणून खेळाशी संबंधित होते. ऑस्ट्रेलियाकडून खेळलेल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी ते एक होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूसाठी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहू लागल्या. भारतासह क्रिकेटविश्वातील अन्य खेळाडूंनी जोन्स यांना श्रद्धांजली वाहिली.

रवि शास्त्री

सचिन तेंडुलकर

विराट कोहली

माइकल क्लार्क

डेविड वॉर्नर

रमीझ राजा

बाबर आझम

हरभजन सिंह

अनिल कुंबळे

मोहम्मद कैफ

स्कॉट स्टायरिस

चाहत्यांनी देखील डीन जोन्सच्या निधनावर शोक व्यक्त केला. पाहा...

तुमची आठवण येईल सर!

दु:खी आणि स्तब्ध

डीआयपी जोन्स RIP!

अप्रत्याशित

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या विक्रमाशिवाय, जोन्स यांनी 245 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देखील खेळले. यामध्ये त्यांनी 55 शतके आणि 88 अर्धशतकांच्या मदतीने 19,188 धावा केल्या.