DC Vs SRH 2020 Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney आणि Star Network वर
DC vs SRH (Photo Credits-File Image)

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 11 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद (Delhi Capitals Vs Sunrisers Hyderabad) आज एकमेकांशी भिडणार आहेत.  शेख जायद स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर करत आहे. तर, सनराइजर्स हैदराबाद संघाचे कर्णधार पद ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज डेव्हिड वार्नर संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, आज 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.

या हंगामात चांगले प्रदर्शन जोरावर दोन्ही सामन्यात विजय मिळवत दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दिल्लीने पहिल्या सामन्यात किग्ज इलेव्हन पंजाब तर, दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला पराभूत केले आहे. दुसरीकडे, सनराइजर्स हैदराबाद संघाचा गेल्या दोन्ही सामन्यात पराभव झाल्याने गुणतालिकेत तळाशी आहे. यामुळे आज सामना हैदराबादच्या संघासाठी महत्वाचा आहे. हे देखील वाचा- IPL 2020 Points Table Updated: रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाकडून पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स टॉप 4 मधून बाहेर; पाहा इतर संघाची स्थिती

दिल्ली कॅपिटल्स:

श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमीयर, कागिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, रिषभ पंत (विकेटकिपर), इशांत शर्मा, एक्झर पटेल, संदीप लामिछाने, केमो पॉल, डॅनियल सॅम , मोहित शर्मा, अनरिच नॉर्टजे, ऍलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोईनिस, ललित यादव

सनरायझर्स हैदराबाद:

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराटसिंग, प्रियांम गर्ग, वृध्दिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बावनका संदीप , संजय यादव, फॅबियन लेन, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी नटराजन, बासिल थंपी