आज (4 मे) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघांचा सामना दिल्लीच्या फिरोज शहा कोटला (Feroz Shah Kotla Ground) मैदानावर रंगणार आहे. दिल्ली संघाने आधीच प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. राजस्थान रॉयल्स संघ स्पर्धेत 11 पॉईंट्ससह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी राजस्थान संघाला हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.
कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?
दिल्ली विरुद्ध राजस्थान हा सामना तुम्ही टीव्ही प्रमाणे ऑनलाईन देखील पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
दिल्ली विरुद्ध राजस्थान नाणेफेक:
Match 53. Rasjasthan Royals win the toss and elect to bat https://t.co/MHl5ZVPywi #DCvRR #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2019
दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
असे असतील दोन्ही संघ:
राजस्थान रॉयल्स: अजिंक्य रहाणे, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिडला, एस. मिधुन, प्रशांत चोप्रा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, स्टीव स्मिथ, ईश सोढी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, जयदेव उनादकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंग, लियाम लिविंगस्टोन, शुभम रंजाने, मनन वोहरा, एश्टन टर्नर, रियान पराग.
दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, अमित मिश्रा, अवेश खान, राहुल तेवतिया, जयंत यादव, कॉलिन मुनरो, क्रिस मॉरिस, संदीप लामिछाने, ट्रेंट बाउल्ट, शिखर धवन, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बेन्स, नाथू सिंग, कोलिन इंग्राम, शेरफेन रदरफोर्ड.
Star Sports 1/HD, Star Sports 1 Hindi/HD, Star Sports Select 1/HD, Hotstar या चॅनलवर देखील तुम्हाला लाईव्ह सामना पाहता येईल.