DC vs MI, IPL 2019 Live Cricket Streaming: फिरोझशहा कोटला मैदानावर आज रंगणार दिल्ली विरूद्ध मुंबई सामना; हॉटस्टारवर पहा लाईव्ह स्ट्रिमिंग
DC vs MI (File Photo)

Delhi Capitals Vs Mumbai Indians, IPL 2019 Live Cricket Streaming:  फिरोझशहा कोटला (Feroz Shah Kotla Ground, Delhi) मैदानात आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ मुंबईचं स्वागत करणार आहे. या मैदानात दिल्ली विरूद्ध मुंबई असा आयपीएल 2019 मधील 34 वा सामना रंगणार आहे. सध्या पॉईंट टेबलमध्ये दिल्ली दुसर्‍या आणि मुंबई तिसर्‍या स्थानी आहे. त्यामुळे पॉईंट टेबलवर अग्रस्थानी राहण्यासाठी दोन्ही संघ चुरशीने खेळतील. तुम्ही आजचा सामना टीव्हीवर पाहू शकत नसल्यास ऑनलाईन स्ट्रिमिंग पार्टनर्सच्या वेबसाईटवर म्हणजेच हॉटस्टारवर (Hotstar) पाहू शकणार आहात.

ऑनलाईन सामना कुठे पहाल?

हॉटस्टारच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर तुम्हांला दिल्ली विरूद्ध मुंबई हा सामना थेट ऑनलाईन पाहता येईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी  येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

स्टार स्पोट्सवर तुम्हांला दिल्ली विरूद्ध मुंबई सामना पाहता येईल. Star Sports 1/HD, Star Sports 1 Hindi/HD, Star Sports Select 1/HD या चॅनलवर सामना लाईव्ह पाहण्याची सोय आहे. सलग तीन विजय पटकावल्यानंतर दिल्लीचा संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळणारा मुंबई संघ देखील दिल्लीला त्यांच्या होमपीचवर नमवण्यासाठी सज्ज असेल.