DC vs KKR IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, पहा प्लेइंग XI
नितीश राणा (Photo Credit: PTI)

DC vs KKR IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) टॉस जिंकून आजच्या सामन्यात पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या (IPL) 25व्या सामन्यात दिल्ली आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रोमांचक लढत होणार आहे. दिल्ली सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे तर कोलकाता पाचव्या क्रमांकावर आहे. अशास्थितीत एकीकडे दिल्ली गुणतालिकेत आघाडी घेऊ इच्छित असेल तर कोलकाता आपली स्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात असेल. आजच्या सामन्यासाठी मॉर्गनच्या कोलकाता संघात कोणताही बदल झालेला नाही तर पंतच्या दिल्ली कॅपिटल्समध्ये एक बदल पाहायला मिळत आहे. दिल्लीने अमित मिश्राला विश्रांती दिली असून त्याच्या जागी ललित यादवचा समावेश केला आहे. (IPL 2021: लसिथ मलिंगाच्या 'या' विक्रमापासून Amit Mishra फक्त 4 विकेट्स दूर, आयपीएलमध्ये इतिहास घडवण्याची संधी)

दोन्ही संघांचे स्पर्धेत आतापर्यंत सहा सामने झाले असून, दिल्लीने 4 सामने जिंकले आहेत, तर कोलकाताला फक्त दोन सामने जिंकले आहेत. शिवाय, दोन्ही संघाच्या आजवरच्या आयपीएल इतिहासाबद्दल बोलायचे तर दिल्लीविरुद्ध कोलकाताचा रेकॉर्ड चांगला आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 27 वेळा आमनेसामने आले आहे. त्यापैकी 14 सामने कोलकाताने तर दिल्लीने 12 सामन्यात बाजू मारली आहे. दुसरीकडे, मागील हंगामात दोन्ही संघ बरोबरीत होते. दिल्ली-कोलकाता आयपीएल 2020मध्ये दोनदा आमनेसामने आले ज्यामध्ये त्यांनी प्रत्येकी दोघांनी प्रत्येकी एक विजय नोंदवला आहे. आजच्या सामन्यापूर्वी आरसीबीविरुद्ध दिल्लीला एका धावेने पराभूत व्हावे लागले होते तर कोलकाताने मागील सामन्यात पंजाब किंग्जवर 5 विकेटने मात केली होती.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन: रिषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टिव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, इशांत शर्मा, ललित यादव, कगिसो रबाडा आणि आवेश खान.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन: इयन मॉर्गन (कॅप्टन), शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, सुनील नारायण/शाकिब अल हसन, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती.