DC vs CSK, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमिअर लीग 13च्या आजच्या दुसऱ्या डबल हेडरमधील 34वा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळला जाणार आहे. आजचा हा सामना शारजाह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स 12 गुणांसह आयपीएलच्या गुणतालिकेत दुसर्या स्थानावर आहेत. दिल्लीने आजवर 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, सीएसके 8 सामन्यात 3 विजयांसह सातव्या क्रमांकावर आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्स या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL मध्ये Taimur ला काही संधी आहे का? विचारत फोटो पोस्ट करणार्या Kareena Kapoor ला Delhi Capitals चा रिप्लाय; इथे पहा दिल्ली संघाची ऑफर)
दिल्ली आणि चेन्नई आयपीएलमध्ये आजवर 21 वेळा सामने-सामने आले आहेत. यापैकी सीएसकेने 14 वेळा विजय मिळविला असून दिल्लीने 7 सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या 13 व्या सत्रातील या दोन संघांमधील हा दुसरा सामना असेल. यापूर्वी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 44 धावांनी विजय मिळविला होता. मागील सामन्यात विजय मिळवल्याने महेंद्र सिंह धोनीच्या कुशल नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जची मोहीम पुन्हा रुळावर परतली आहे, परंतु संघासमोर सातत्याने चांगली कामगिरी बजावणाऱ्या दिल्लीचे एक कठीण आव्हान असेल.
पाहा चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ
चेन्नई सुपर किंग्स: महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), मुरली विजय, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, लुंगी एनगीडी, दीपक चाहर, पियुष चावला, इमरान ताहिर, मिशेल सॅटनर, जोश हेझलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम कुरन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, रुतुराज गायकवाड आणि कर्ण शर्मा.
दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, कगिसो रबाडा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, संदीप लमिछाने, किमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिच नॉर्टजे, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्क्स स्टोइनिस आणि ललित यादव.