CWC Super League Points Table: श्रीलंकेकडून पराभवानंतर वर्ल्ड कप सुपर लीग पॉइंट्स टेबलमध्ये भारतीय संघाला तोटा
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

CWC Super League Points Table: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) कोलंबो (Colombo) येथे झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाला (Team Inddia) तिसर्‍या आणि शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मालिकेतील अखेरचा सामना तीन गडी राखून श्रीलंका संघ क्लिन स्वीपच्या पेचातून बचावला. श्रीलंकेचा संघ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगच्या पॉईंट टेबलमध्ये (World Cup Super League Points Table) पुढे गेला आहे. तसेच, टीम इंडिया गुणतालिकेत चौथ्या स्थानावर घसरला आहे. मात्र भारतीय संघाला (Indian Team) क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगच्या गुणतालिकेची अधिक चिंता करण्याची गरज नाही आहे. 2023 वनडे विश्वचषकचे आयोजन भारतात होणार असल्याने संघ यजमान राष्ट्र म्हणून आधीच पात्र ठरला आहे. (IND vs SL 1st T20I: टी-20 आव्हानासाठी टीम इंडिया सज्ज, पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरेल तगड्या खेळाडूंची फौज; पाहा संभाव्य प्लेइंग XI)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील या मालिकेत यजमान संघाचा सलामी फलंदाज अविष्का फर्नांडोने आपल्या फलंदाजीने प्रभावित करून सर्वाधिक धावा केल्या, पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावण्यात भारताच्या सूर्यकुमार यादवने बाजी मारली. त्याला दोन सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली आणि दोन्हीमध्ये त्याने अर्धशतक ठोकले. गोलंदाजी विभागात भारताच्या युजवेंद्र चहलने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. त्याने मालिकेत एक सामना कमी खेळला, परंतु असे असूनही त्याच्या नावावर सर्वाधिक विकेट्सची नोंद झाली. विश्वचषक सुपर लीगच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला विजयासाठी 10 गुण मिळतात, परंतु सामना रद्द किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी पाच गुण मिळतात. सामना गमावण्यासाठी एकही गुण दिला जात नाही, तर स्लो ओव्हर रेटसाठी गुण देखील वजा केला जातो. आयसीसी पुरूष क्रिकेट विश्व चषक सुपर लीग पॉइंट्स टेबल

दुसरीकडे, आता वनडे मालिकेनंतर दोन्ही संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आमनेसामने येणार आहेत. 25 जुलै रोजी पहिला टी-20 सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यापूर्वी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वात भारताने 2-1 अशी मालिका खिशात घातली आहे.