SRH Vs CSK 29th IPL Match 2020 Toss Report: चेन्नई सुपर किंग्ज संघाने टॉस जिंकला; सनरायझर्स हैदराबाद करणार प्रथम गोलंदाजी

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 29 व्या सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज  (Sunrisers Hyderabad Vs Chennai Super Kings) एकमेकांशी भिडणार आहे. दुबईच्या आंतराष्ट्रीय (Dubai Inernational Stadium) मैदानात हा सामना पार पडणार आहे. या सामन्यात चेन्नईच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या हंगामातील निम्मी स्पर्धा संपली असून आजचा सामना हैदराबाद आणि चेन्नईच्या संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. या हंगामात दोन्ही संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबादचा संघ सहाव्या तर, चेन्नईचा संघ सातव्या क्रमांकावर आहेत.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा- IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मॅचपूर्वी मुंबई इंडियन्सने केलेल्या ट्विटने वादाला सुरुवात, फिक्सिंगच्या चर्चांना उधाण, पाहा Post

संघ-

चेन्नई सुपर किंग्ज: शेन वॉटसन, अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिस, एमएस धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), सॅम कुर्रान, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, दीपक चहर.

सनरायझर्स हैदराबाद: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मनीष पांडे, केन विल्यमसन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, रशीद खान, संदीप शर्मा, खलील अहमद, टी नटराजन.