चेन्नई सुपर किंग्ज (Photo Credit: PTI)

CSK vs MI IPL 2021: गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आयपीएल (IPL) 2021 चा संयुक्त अरब अमिरातीचा लेग सुरु करेल. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील स्पर्धा ही स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. आतापर्यंत 31 सामन्यांमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत ज्यात मुंबई इंडियन्स वरचढ ठरली आहे. मुंबईने चेन्नईविरुद्ध आतापर्यंत 19 सामने जिंकले आहेत. याशिवाय जेव्हा गेल्या सामन्यात जेव्हा दोन्ही संघात टक्कर झाली देखील मुंबईने रोमांचक सामन्यात विजय मिळवला होता. दरम्यान, या सामन्यात पहिले फलंदाजी करताना सीएसकेने 218 धावांचा डोंगर उभारला. तसेच, गोलंदाज चांगले काम करत होते, पण किरोन पोलार्डच्या स्फोटक खेळीच्या जोरावर मुंबईने रोमांचक सामना जिंकला. तथापि, आयपीएल 2021 मधील मुंबई विरुद्ध दुसऱ्या चकमकीत सामन्यात चेन्नई संघातील काही प्रमुख खेळाडू खेळू शकणार नाही.

सॅम कुरन (Sam Curran)

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू सॅम कुरन आयपीएल 2021 यूएईच्या पहिल्या सामन्यात उपलब्ध होणार नाही. उल्लेखनीय म्हणजे, इंग्लिश अष्टपैलू बुधवार, 15 सप्टेंबर रोजी यूएईमध्ये दाखल झाला आहे. तर, आता त्याला त्याच्या सहकाऱ्यांसह प्रशिक्षण सुरु करण्यापूर्वी 6 दिवस क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागेल. तसेच या काळात त्याला अनेक कोविड -19 चाचण्या कराव्या लागणार आहेत आणि जर त्याच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या तरच त्याला त्याच्या खोलीतून बाहेर येण्याची परवानगी दिली जाईल. कुरनची मुंबई इंडियन्सविरुद्ध उल्लेखनीय लढतीला अनुपस्थिती धोनीच्या संघासाठी मोठा धक्का आहे. आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात कुरनने सर्व 7 सामने खेळले आणि 9 विकेट्स घेतल्या आणि 52 धावा केल्या.

फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis)

आयपीएल 2021 यूएईच्या लेगमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात डू प्लेसिसच्या उपलब्धता अनिश्चित आहे. विशेष म्हणजे, माजी आफ्रिकन कर्णधाराला CPL 2021 मध्ये दुखापत झाली होती. तो लीगमध्ये एक उत्कृष्ट धावा करणारा फलंदाज होता. मात्र, दुखापतीमुळे तो सेमीफाइनल आणि फायनल सारख्या महत्त्वाच्या सामन्यांत खेळू शकला नाही. चेन्नईला डु प्लेसिसची कमतरता नक्कीच जाणवेल. आयपीएल 2021 च्या भारतीय लेगमध्ये तो फ्रँचायझीसाठी सर्वाधिक धावा करणारा होता. 7 सामने खेळून डु प्लेसिसने 320 धावा केल्या आणि आयपीएल 2021 इंडिया लेगमध्ये तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. चेन्नई सुपर किंग्जला ड्यु प्लेसिसला सुरुवातीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करायचा असेल तर त्याची बदली म्हणून योग्य खेळाडूची निवड करावी लागेल.