इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामात (IPL 2024) मंगळवारी (26 मार्च) गतविजेता चेन्नई सुपरकिंग्स आणि गतउपविजेता गुजरात टायटन्स आमने-सामने येणार आहेत. त्याचमुळे ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल या दोन युवा खेळाडूंच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
चेन्नईत लढत रंगणार असून दोन्ही कर्णधार विजयी वाटचाल कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतील. महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली ऋतुराजने सलामीच्या लढतीत अव्वल दर्जाचे नेतृत्व केले. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला बंगळूरविरुद्धच्या सलामीच्या लढतीत सूर गवसला नाही. शुभमन गिलनेही मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात उत्तम नेतृत्व करत गुजरातला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष राहिल. (हेही वाचा - RCB Beat PBKS, IPL 2024 6th Match Live Score Update: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्जवर 4 विकेट्सने विजय, विराट कोहलीची 77 धावांची शानदार खेळी)
CSK विरुद्ध GT सामन्याची वेळ:
सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक 7:00 वाजता होईल. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. त्याच वेळी, मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर उपलब्ध असेल.
पाहा दोन्ही संघ -
- चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मिचेल सँटनर, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, निशांत सिंधू, अजय मंडल, दीपक चाहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, महिष तिक्षणा, सिमरजीत सिंग, राजवर्धन हंगरगेकर, मथिशा पाथिराना, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, डॅरिल मिचेल, रचिन रवींद्र, शार्दूल ठाकूर, समीर रिझवी, मुस्ताफिझूर रहमान, अविनाश अरवेल्ली.
- गुजरात टायटन्स - शुभमन गिल (कर्णधार), केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, विजय शंकर, जयंत यादव, दर्शन नळकांडे, मोहम्मद शमी, आर साई किशोर, मोहित शर्मा, नूर अहमद, राशिद खान, जोशुआ लिटिल, उमेश यादव, अझमतुल्लाह ओमरझई, सुशांत मिश्रा, मानव सुतार, कार्तिक त्यागी , स्पेन्सर जॉनसन, रॉबिन मिन्झ, शाहरुख खान, शरद बीआर.