(Photo by Steve Bardens/Getty Images)

दक्षिण आफ्रिका सरकारने (South Africa Government) देशाची राष्ट्रीय क्रिकेट संस्था, क्रिकेट दक्षिण आफ्रिका (Cricket South Africa) निलंबित केली आणि स्वत: क्रिकेटींगचे कार्य हाती घेतले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी संबंधित बाबींमध्ये सरकारच्या हस्तक्षेपाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (International Cricket Council) नियमांच्या विरोधात हे पाऊल उचलले गेले असून यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण आफ्रिकेला (South Africa) खेळातून काढून टाकले जाऊ शकते. वृत्तानुसार मंडळाच्या अंतर्गत भांडणामुळे सरकारने क्रिकेट बोर्डाला स्थगित केले आणि क्रिकेट ऑपरेशनवर ताबा मिळवला. क्रिकेटशी संबंधित वेबसाइट क्रिकबझच्या अहवालानुसार दक्षिण अफ्रिकेच्या क्रीडा संघटना व ऑलिम्पिक समितीने (SASCOC) क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला पत्र लिहून वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंडळाच्या कारभारातून पायउतार होण्यास सांगितले आहे. SASCOCनुसार, सीएसएमध्ये मागील वर्षी डिसेंबर महिन्यापासून गैरव्यवस्थापन आणि गैरवर्तन करीत आहे ज्याची चौकशी केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या पत्रात SASCOCने सीएसएला सांगितले की या घटनांमुळे तुमचे सदस्य, माजी सदस्य, राष्ट्रीय संघ सदस्य, भागधारक, प्रायोजक आणि क्रिकेट प्रेमींच्या चिंता वाढल्या आहेत. या घटनांमुळे सार्वजनिक, भागधारक, प्रायोजक आणि खेळाडूंचा क्रिकेटवरील विश्वास उठला यात काही शंका नाही आणि या सर्व गोष्टींमुळे क्रिकेटची प्रतिमाही खराब झाली आहे. दरम्यान, तपासाचा अंतिम निकाल येणे अद्याप बाकी आहे.SASCOCने म्हटले की त्यांनी सीएसएला फॉरेन्सिक अहवाल सादर करण्यास सांगितले होते पण, क्रिकेट बोर्डाचा प्रतिसाद पूर्णपणे युक्तिसंगत आणि अवास्तव असल्याचे समजले.

‘SASCOCने सीएसए बोर्डाशी झालेल्या दोन बैठकीत या मुद्द्यांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला: सीएसएने दिलेली आश्वासने व उपक्रम असूनही SASCOC बोर्डाला... फॉरेन्सिक अहवाल उपलब्ध करुन देण्यात सीएसए अपयशी ठरले,’ असे SASCOC म्हणाले. दक्षिण आफ्रिकन क्रीडा संघ आणि ऑलिम्पिक समिती (SASCOC) राज्य आणि क्रीडा महासंघ यांच्यातील संबंधांची देखभाल करते आणि म्हणून त्यांना सीएसएला प्रशासनाखाली आणण्याचा अधिकार आहे. हा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आणि सर्वानुमते मताने त्याला मंजुरी मिळाली.