Krunal Pandya (Photo Credits: ANI)

आयपीएल च्या 13 (IPL 13) व्या सीजनचे विजेतपद पटकावून दुबई (UAE) हून परतत असलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा खेळाडू क्रुणाल पांड्या (Krunal Pandya) याला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले आहे. UAE हून परतत असताना अवैध सोने आणि इतर मौल्यवान वस्तूच्या बाळगल्याच्या संशयावरुन क्रिकेटपटू याची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) संचालनालय महसूल बुद्धिमत्ता (Directorate of Revenue Intelligence) यांच्याकडून अडवणूक करण्यात आली. अशी माहिती DRI च्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.

रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, क्रुणाल पांड्याकडे मर्यादापेक्षा अधिक सोने सापडले. सध्या क्रुणाल पांड्याची चौकशी सुरु असून मोल्यवान वस्तूंचे अधिकृत कागदपत्रांची मागणी केली जात आहे. आयपीएल ट्रॉफी पाचव्यांदा आपल्या नावावर केल्यानंतर मुंबई इंडियन्स संघ आणि चाहते अत्यंत आनंदात होते. मात्र क्रुणाल पांड्या या बातमीनंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (IPL 2020: हार्दिक आणि क्रुणाल यांच्यात कोण आहे 'स्मार्ट पांड्या'? मुंबई इंडियन्स अष्टपैलू किरोन पोलार्डने केला खुलासा, पाहा Video)

ANI Tweet:

1 एप्रिल 2016 पासून सुरु झालेल्या नव्या नियमानुसार, दुबईहून भारतात परतणाऱ्या पुरुष प्रवाशाला 20 ग्रॅम सोने तर महिला प्रवाशाला 40 ग्रॅम सोने आणण्याची परवानगी आहे.

यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये क्रुणाल पांड्याने मुंबई इंडियन्स संघासाठी 16 मॅचेसमध्ये 109 धावा करत 6 गडी बाद केले. मुंबई इंडियन्स संघाच्या विजयात त्याने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. दरम्यान, आपीएलचा 13 वी सीजन मार्च महिन्यात होणार होता. मात्र कोरोना व्हायरस संकटामुळे तो लांबणीवर पडला आणि 19 सप्टेंबरपासून आयपीएल 2020 ला सुरुवात झाली. 10 नोव्हेंबर रोजी आयपीएलचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात रंगला. त्यात मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारली.