पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याची सध्या कोरोना व्हायरसच्या संकट काळात करत असलेल्या कामाचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट दरम्यानही आफ्रिदी अनेक गोष्टींसाठी चर्चेत बनून होता. त्यातील एक म्हणजे त्याची आत्मचरित्र. यात अफरीदीने अनेक खुलासे केले. पण एक किस्सा ज्याने भारतीय चाहत्यांचेही लक्ष वेधले तो म्हणजे त्याने 1996 मध्ये 37 चेंडूत ठोकलेले सर्वात जलद वनडे शतक.अफरीदने श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) सामन्यात शतक झळकावले आणि रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव करेल. पण यामागची एक मनोरंजक गोष्ट म्हणजे आफ्रिदीच्या रेकॉर्ड शतकी डावात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) सहभागी होता. अफरीदीने मागील वर्षी त्याचे पुस्तक‘गेम चेंजर’मध्ये म्हटले की, वनडे सामन्यातील वेगवान शतक त्याने सचिनच्या बॅटने ठोकले होते. नैरोबीमध्ये सचिनची बॅट आफ्रिदीपर्यंत कशी पोहोचली यामागे एक रंजक कहाणी आहे. (सचिन तेंडुलकरचा सर्वोत्तम डाव: जेव्हा मास्टर ब्लास्टरने आपला आवडता शॉट न खेळता केल्या 241 धावा, त्याची शिस्त बनली सर्वांसाठी धडा)
सचिनने वकार युनूस यांना सियालकोटमध्ये त्याची प्रतिकृती तयार करण्यासाठीआपली बॅट दिली होती. अफरीदीने पुस्तकात लिहिले,".. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की वकारने ती बॅट सियालकोटला नेण्यापूर्वी काय केले? त्याने मला ती बॅट दिली आणि मी त्याच्याबरोबर फलंदाजी केली. मी नैरोबीत पहिले शतक सचिनच्या बॅटने बनवले होते." 1996 मध्ये पाकिस्तानकडून पदार्पण मालिकेमध्ये श्रीलंकेविरूद्ध अफरीदीने 37 चेंडूत खळबळजनक शतकी खेळी केली. आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सर्वात तीन खेळाडूंनी सर्वात जलद शतक ठोकले आहेत, पण आफ्रिदी त्यामधील पहिला फलंदाज ठरला. पाकिस्तानी फलंदाजाने वयाच्या 16 व्या वर्षी हा डाव खेळला असल्याचा समाज होता, पण याच पुस्तकात आपले योग्य वय सांगितले आणि त्यावेळी तो 21 वर्षाचा असल्याचे म्हटले. अफरीदीने आत्मचरित्रात त्याचा जन्म 1975 मध्ये झाला असल्याचा उल्लेख केला.
पाहा अफरीदीचा तो डाव:
2014 मध्ये न्यूझीलंडच्या कोरी अँडरसन याने 36 चेंडूत शतक झळकावले आणि अफरीदीचा विश्व विक्रम मोडला. आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स याने 2015 वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात 31 चेंडूत शतकी डाव खेळत इतिहासाची नोंद केली.