सकारात्मक, नकारात्मक आणि सकारात्मक ... कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) बदलत्या अहवालामुळे मोहम्मद हाफीज (Mohammad Hafeez) अडचणीत सापडला आहे. एकीकडे त्याच्या कोरोना टेस्टचा अहवालाचा गोंधळ संपत नसताना, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) क्वारंटाइन प्रोटोकॉल तोडल्याबद्दल त्याच्या विरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा विचार करत आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी 29 खेळाडूंसह हाफीजची निवड करण्यात आली होती. पाकिस्तानी संघ येत्या काही दिवसात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होईल जिथे ते टेस्ट आणि टी-20 मालिका खेळतील. त्यानुसार, सर्व खेळाडूंची कोरोना टेस्ट कारण्यावण्यात आली, ज्यात हाफीज सात अन्य खेळाडूंसह पॉसिटीव्ह आढळला. पण, दुसर्याच दिवशी माजी पाकिस्तानी कर्णधाराने एका खासगी वैद्यकीय सुविधेच्या अहवालासह एक ट्विट पोस्ट केले ज्यामध्ये त्याने केलेली कोरोना टेस्ट नकारात्मक दिसून आली. त्यानंतर बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिजची शौकत खानम रुग्णालयात पुन्हा चाचणी घेण्यात आली असून, त्याचा अहवाल सकारात्मक आला आहे. (Coronavirus: मोहम्मद हाफिजची दुसरी कोरोना चाचणी निगेटीव्ह, एक दिवस आधी PCB ने संसर्ग झाल्याची दिली होती माहिती)
“मंडळासाठी ही अत्यंत पेचप्रद परिस्थिती आहे. आठवड्याच्या सुरुवातीच्या पहिल्या कसोटीत सकारात्मक चाचणी असलेल्या 10 खेळाडूंपैकी आज घेण्यात आलेल्या दुसर्या टेस्टचा निकाल काय आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे," असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी सर्व चाचण्यांचे निकाल जाहीर करणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे. शनिवारी पुन्हा हाफिजची सकारात्मक चाचणी आल्यास पहिल्या टेस्टच्या निकालानंतर क्वारंटाइन राहण्याऐवजी दुसरी टेस्ट करवण्यासाठी त्याला बोर्डकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुसरीकडे, हफीजच्या जवळच्या सूत्रांनी त्याच्या कृतीचा बचाव केला आणि पहिली टेस्ट सकारात्मक आल्यावर खेळाडूला खूप त्रास झाला आणि तो त्याच्या जवळच्या कुटुंबाबद्दल निश्चितच काळजीत होता असा आग्रह धरला. सूत्रांनी सांगितले की, “म्हणूनच त्याने खबरदारीचा उपाय म्हणून खाजगीरित्या दुसरी टेस्ट केली आणि अधिकाऱ्यांना लाजविण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता,” सूत्रांनी सांगितले.