मयंक अग्रवाल आणि सुरेश रैना (Photo Credit: Twitter)

Karwa Chauth 2020: करवा चौथचा सण प्रत्येक विवाहित स्त्री मोठ्या श्रद्धेने साजरा करते. अनेक भारतीयांप्रमाणे टीम इंडिया (Team India) खेळाडूंच्या पत्नींनी देखील आपल्या पतीसाठी करावा चौथचा उपवास केला. काहींनी आपल्या घरी, तर अनेक खेळाडूंनी युएई 9UAE) येथे करावा चौथचा सण साजरा केला. भारताचे अनेक खेळाडू सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) निमित्ताने युएई येथे जमले आहेत. अशा स्थितीत त्यांच्या पत्नींनी तिथेच उपवास करत आपली पूजा संपन्न केली. सुरेश रैना (Suresh Raina), भुवनेश्वर कुमार, वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांनी आपल्या घरीच सण साजरा केला, तर रोहित शर्मा (Rohit Shrama), मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) जे अद्यापही युएई येथे आहेत अशांनी अनोख्या अंदाजात सण साजरा केला आणि सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी काही क्षण देखील शेअर केला. विशेष म्हणजे आपल्या चाहत्यांना करावा चौथच्या शुभेच्छा देताना मयंक अग्रवालने एक मजेशीर पोस्ट शेअर केली. (Karwa Chauth 2020: बॉलिवूडमध्ये दिसली 'करवा चौथ'ची धूम; शिल्पा शेट्टी, सोनाली बेंद्रे, काजोल, बिपाशा बसू, रवीना टंडन अशा अभिनेत्रींनी केली पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा)

मयंकने आपल्या पत्नीसोबत पोस्ट शेअर करत लिहिले की, "आनंद साजरा करणाऱ्या प्रत्येकाला हसू आणि शुभेच्छा. हे करवा चौथ आपल्यासाठी आणि आपल्या जोडीदारासाठी सुपर स्पेशल असेल. पी.एस: सर्व पतींना त्यांचे जीवन विमा नूतनीकरणाबद्दल अभिनंदन." मयंकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुरेश रैनाने लिहिले, "करवा चौथच्या शुभेच्छा! हा शुभ दिवस आपल्याला चिरंतन एकात्मता आणू दे आणि आपल्या प्रेमाच्या बंधनास आणखीन बळकट करो."

"जालंधर मध्ये चंद्र दिसला," हरभजनने लिहिले.

"करवा चौथच्या शुभेच्छा! आपल्या आयुष्यात चंद्र असाच चमकत राहू दे," भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पत्नी नुपूरसोबत फोटो शेअर करत म्हटले.

वीरेंद्र सेहवाग

रोहित शर्माची पत्नी रितिकाने इंस्टाग्रामवर आपल्या करावा चौथची झलक शेअर केली. दोघांनी यंदा युएई येथे यंदाचा सण साजरा केला.

(Photo Credit: Instagram)

दरम्यान, करवा चौथ निमित्त महिलांमध्ये नटण्याचा उत्साह असतो. नवे कपडे, साजशृंगार, हातावर मेहंदी अशा पारंपारिक वेशात विवाहित महिला तयार होतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. पारंपारिकपणे कुटुंबातील सर्व महिला एकत्रित जमून या व्रताची पूजा पार पडतात परंतु, यंदा कोविड-19 संकटामुळे फार गर्दी करणे, भेटीगाठी शक्य नसले तरी सणाचा उत्साह मात्र दरवर्षीप्रमाणेच राहिला.